शेतकऱ्यांचा जीव हा पुर्णपणे त्यांच्या गाई गुरांवर असतो कारण त्यांचा संसार पूर्ण त्याच्यावर चालू असतो. त्यांच्या जीवनात बैलजोडीला खूप महत्वाचं स्थान दिले आहे, शेतकरी त्यांच्या घरामधील पाळीव प्राण्यांवर किती प्रेम करतो हे पुन्हा एकदा आपल्या समोर आलेले आहे.
पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यात वडगाव या गावात शंकर पाटोळे हे शेतकरी राहतात त्यांच्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाला. शंकर पाटोळे या शेतकऱ्याने त्यांच्या बैलाच्या मृत्यूनंतर त्याची दशक्रिया विधी पूर्ण केली पण त्यांनी एवढेच नाही तर बैलाची आठवण कायम राहावी म्हणून घरासमोर हुबेहूब बैलाचा पुतळा उभा केला. त्यांच्या कुटुंबियांचे बैलाबद्धल असणारे प्रेम आपल्या यामधून दिसून येत आहे तसेच सगळीकडे त्याची चर्चा सुद्धा चालू आहे.
दशक्रिया विधी केला अनं पुतळाही उभारला:
प्रत्येक शेतकरी आपल्या लाडक्या बैलाचा सांभाळ आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे करत असतो फक्त एवढेच नाही तर त्याचा बैल आजारी जरी पडला तर त्या शेतकऱ्याचा जीव वर खाली होतो. बैलाचा मृत्यू झाला की त्यानंतर त्याचे रडू कोसळते व त्याची दशक्रिया पूर्ण करतो पण वडगाव मधील शेतकऱ्याने आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यु झाला म्हणून त्याच्या आठवणीत चक्क आपल्या घरासमोर बैलाचा पुतळा उभा केला.
२८ वर्षांपासून कुटुंबाचा भाग:
शंकर पाटोळे यांच्या गाईला २८ वर्षांपूर्वी खोंड झाले होते त्या खोंडाचे नाव शेलार असे ठेवले होते हे खोंड त्यांच्या कुटुंबाचा एक महत्वपूर्ण भाग बनले होते. १५ दिवस झाले त्यांच्या बैलाचा मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्या सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन बैलाची आठवण त्यांच्या नेहमी स्मरनात राहावी म्हणून घरासमोर त्यांच्या बैलाचा शेलारचा पुतळा बांधला.पाटोळे यांच्या कुटुंबाचे त्यांच्या बैलावर प्रेम बघून असे समजले की बळीराजा शेतकऱ्यासाठी त्यांचा बैल किती महत्वपूर्ण असतो आणि त्यांचे प्रेम किती असते. अनेक लोक शंकर पाटोळे यांच्या घरी जाऊन तो पुतळा पाहतात.
Published on: 09 July 2021, 07:54 IST