Others News

आज मेष, धनू, मकर, तूळ सावध राहण्याची गरज आहे. हातची संधी गमावू नका. आरोग्य जपण्याचा सल्ला देखील या राशीच्या लोकांना दिला जात आहे. कानाने एकाल, डोळ्याने पहाल त्यावरच विश्वास ठेवा. हा सल्ला विशेष कुंभ राशीना दिला जात आहे.

Updated on 26 September, 2022 6:04 PM IST

आज मेष, धनू, मकर, तूळ सावध राहण्याची गरज आहे. हातची संधी गमावू नका. आरोग्य जपण्याचा सल्ला देखील या राशीच्या लोकांना दिला जात आहे. कानाने एकाल, डोळ्याने पहाल त्यावरच विश्वास ठेवा. हा सल्ला विशेष कुंभ राशीना दिला जात आहे.

मेष

मेष राशीच्या लोकांनी मिळालेली संधी वाया घालवू नका. नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कोणालाही जामिन राहू नका. आरोग्य जपा. गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे टाळा. अभ्यासाकडे लक्ष द्याल. वाचन वाढवावे लागेल. घरी अनपेक्षित पाहुणे येण्याची शक्यता आहे. शुभरंग : काळा

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनी कोणाच्याही अनावश्यक बोलण्याकडे लक्ष देऊ नये . कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराशी वादविवाद टाळा. कोणावरही अपेक्षांचे ओझे ठेवू नका. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. मोगऱ्याचे झाड घरातील अंगणात लावून त्याची निगा राखा. शुभरंग : आकाशी

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना घरात आनंदी वातावरण निर्माण करावे लागेल. चुकीच्या गोष्टींना आळा घाला. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे ठरेल. जास्त धावपळ करू नका. आरोग्यासाठी विश्रांती घेणे आवश्यक ठरेल. प्रिय व्यक्तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न कराल. वडीलधाऱ्या मंडळींकडे लक्ष द्या. गोड बोलून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न कराल. शुभरंग: आकाशी

कर्क

कर्क राशीच्या लोकांनी इच्छाशक्ती दांडगी ठेवली पाहिजे. नवीन नातेसंबंध जोडाल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. घरातील प्रश्न एकमेकांच्या सहकार्याने सोडवा. आवडत्या व्यक्तिच्या कामाचे कौतुक कराल. जोडीदाराला भेटवस्तू द्या. शुभरंग : पोपटी

LIC ची भन्नाट योजना; फक्त 2 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार 48 लाख रुपयांचा परतावा

सिंह

सिंह राशीच्या लोकांना आनंद होईल अशा घटना घडतील. घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन घ्याल. सकाळी लवकर उठून चालण्याचा व्यायाम करा. प्रेमाच्या माणसांशी तुटक वागू नका. जोडीदाराकडून कोणत्याही खासगी गोष्टी लपवू नका. मित्रांपासून सावध राहा. शुभरंग : पोपटी

कन्या

कन्या राशीच्या लोकांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोणालाही नको ती आश्वासने देऊ नका. अति बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मनातील नाराजी काही वेळा व्यक्त न केलेलीच बरी असते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आत्मविश्वास वाढवा. शुभरंग : पांढरा

तूळ

तूळ राशीच्या लोकांना तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. अडचणींतून मार्ग सापडेल. व्यवसायातील निर्णय शांतपणे घ्या. नव्या संकल्पना सुचण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन बदलांना सामोरे जावे लागेल. कुटुंबासाठी वेळ काढा. शुभरंग : बदामी

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहारात गुप्तता ठेवावी. बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा. स्वत:च्या छंदाकडे लक्ष द्या. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. प्रेमसंबंधात सावधानता बाळगा. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. आवडत्या ठिकाणी फिरायला जाण्याचे नियोजन कराल. शुभरंग : लाल

घरसबसल्या सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला होईल 5 लाख रुपयांची कमाई

धनु

आपले ते खरे करू नये. भावनेच्या भरात नको ती चूक करू नका. अनावश्यक वस्तूंची खरेदी करू नका. जुनी येणी वसूल होतील. प्रयत्न अर्धवट सोडू नका. नोकरी करणाऱ्या व्यक्तिंच्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. देवीमहात्म्य वाचा. शुभरंग : पांढरा

मकर

मकर राशीच्या लोकांना दिलेला शब्द पाळण्याची गरज आहे. सुविचारी मित्रांशी नाते जोडा. कुटुंबियांना विश्वासात घ्याल. टोकाची भूमिका घेऊ नका. कुटुंबातील व्यक्तिच्या मनाचा विचार करा. अचानक स्वभाव बदलण्याचे कारण शोधून काढा. प्रलोभनांपासून सावध राहा. शुभरंग : मोरपिसी

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनो ऐकीव बातमीवर विश्वास ठेवू नका. अतिघाई करू नका. कामाचा व्याप वाढून नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडण्याची शक्यता आहे. कामे योग्य वेळेत पूर्ण करा. नोकरी-व्यवसायात येणारा काळ लाभदायक ठरेल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. तीर्थयात्रा करण्याची इच्छा होऊ शकते. शुभरंग : चंदेरी

मीन

मीन राशीच्या लोकांना तडजोड करावी लागेल. आज एखादी चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकमेकांसाठी वेळ काढाल. घरातील लहान मुलांकडे लक्ष द्यावे लागेल. शुभरंग : नारिंगी

महत्वाच्या बातम्या 
सावधान! शेळ्या-मेंढ्यांमध्ये वाढतोय न्यूमोनिया आजार; करा वेळीच उपाय
शेतकऱ्यांना 'या' 12 योजनेतून मिळणार 75 टक्के अनुदान; 83 लाख रुपयांचा निधी जाहीर
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हरभरा, ज्वारी, करडईच्या बियाण्यांवर मिळणार 'इतके' अनुदान

English Summary: Today Horoscope Know horoscope
Published on: 26 September 2022, 06:04 IST