बऱ्याच दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये अस्थिरता असून कधी दरवाढ पाहायला मिळते तर कधी दर घसरताना बघायला मिळत आहेत.जर आपण आजचा म्हणजेच आठवड्याच्या पहिल्या दिवसाचा विचार केला तर आज व्यवहारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली.
जर आपण आयबीजेए अर्थात इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळाचा विचार केला तर आज सोन्याचे दर 200 रुपयांनी महाग होऊन पन्नास हजार 784 रुपये झाले. दुपारी बारा वाजता एमसीएक्स वर सोने 117 रुपयांच्या वाढीसोबतच 50485 रुपयांवर व्यवहार करत होते.
चांदीच्या दरात देखील वाढ
आज चांदी 610 रुपयाने महागुन 53 हजार 82 रुपये प्रतिकिलो झाली तर एमसीएक्स वर दुपारी बारा वाजता 292 रुपयांच्या वाढीसह 53 हजार 314 रुपयांवर व्यवहार करत होते.
सोन्याचे कॅरेट नुसार आजचे भाव( प्रति तोळा)
1- 24 कॅरेट- 50 हजार 784 रुपये
2- 23 कॅरेट- 50 हजार 581 रुपये
3- 22 कॅरेट- 46 हजार 518 रुपये
4- 18 कॅरेट- 38 हजार 88 रुपये
नक्की वाचा:Important: जीवन विमा पॉलिसीवर कसे मिळते कर्ज? वाचा या संबंधी महत्वाची माहिती
Published on: 05 September 2022, 06:49 IST