Today Gold Price: जर तुम्हालाही सणासुदीच्या तोंडावर सोने (Gold) आणि चांदी (Silver) खरेदी करायची असेल तर ही चांगली सुवर्णसंधी आहे. कारण सोने आणि चांदी त्याच्या उच्चांक दरापासून (High rate) स्वस्त मिळत आहे. त्यातच तुम्हाला 10 ग्रॅम सोने फक्त 30528 रुपयांना मिळत आहे.
गुरुवारी सोन्याचा भाव 47 रुपयांनी महागला आणि तो 52081 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. तर बुधवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने प्रति दहा ग्रॅम 27 रुपयांनी स्वस्त होऊन 52034 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. त्याचवेळी चांदी 721 रुपयांनी स्वस्त होऊन 57100 रुपये किलोवर बंद झाली.
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत
अशाप्रकारे गुरुवारी 24 कॅरेट सोने 47 रुपयांनी महाग होऊन 52081 रुपयांना झाले, 23 कॅरेट सोने 46 रुपयांनी महाग होऊन 51872 रुपयांना झाले, 22 कॅरेट सोने 43 रुपयांनी महाग होऊन 47706 रुपयांना झाले, 18 कॅरेट सोने 36 रुपयांनी महाग होऊन 39061 रुपयांना झाले आणि 14 कॅरेट सोने 36 रुपयांनी महाग होऊन 30467 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ
रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या युद्धापासून आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील सराफा बाजारात (Bullion Market) अस्थिरतेची स्थिती पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत जगभरात सोन्या-चांदीच्या दरात चढाओढ सुरू आहे. दररोज सोने आणि चांदीच्या दरात बदल पाहायला मिळत आहेत.
सोने आणि चांदी उच्चांक दरापासून स्वस्त
ऑगस्ट 2020 मध्ये सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता तेच सोने आणि चांदी स्वस्त दरात मिळत आहे. गुरुवारी वाढलेल्या सोन्याच्या भावनानंतर सोने सध्या 4119 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त मिळत आहे. चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 22880 रुपये प्रति किलो दराने स्वस्त मिळत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.
दुग्धउत्पादनात होणार भरघोस वाढ! या हिरव्या चाऱ्याने जनावरांच्या दुधात होतेय वाढ; जाणून घ्या...
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोने आणि चांदीचे दर
तुम्हाला घरबसल्या सोने आणि चांदीचे दर जाणून घेयचे असतील तर तुम्ही मिस्ड कॉल देऊन जाणून घेऊ शकता. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच तुम्ही वारंवार होणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
महत्वाच्या बातम्या:
IMD Alert: 'या' जिल्ह्यांना 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
किसान क्रेडिट कार्डचा रेकॉर्डब्रेक शेतकऱ्यांनी घेतला लाभ; आहेत फायदेच फायदे...
Published on: 19 August 2022, 12:07 IST