Others News

आज आठवड्याचा पहिला दिवस असतानाच सोने आणि चांदीच्या दरात वाढपाहायला मिळाली. आज सोन्याच्या दरात 66 रुपयांची वाढ झाली असून चांदीचे दर हे किलोमागे 99 रुपयांनी वाढले आहेत.

Updated on 17 January, 2022 1:58 PM IST

 आज आठवड्याचा पहिला दिवस असतानाच सोने आणि चांदीच्या दरात वाढपाहायला मिळाली. आज सोन्याच्या दरात 66 रुपयांची वाढ झाली असून चांदीचे दर हे किलोमागे 99 रुपयांनी वाढले आहेत.

एक आठवड्यात सोन्यात 390 रुपयांनी वाढ

 मागच्या आठवड्यामध्ये सोन्याचे भाव ते तीनशे नव्वद रुपये प्रति 10 ग्रॅम ने वाढले होते तर चांदीच्या दरात एक हजार पाचशे आठ रुपये प्रति किलो वाढ झाली होती. इंडिया बुलियन अंड ज्वेलर्स असोसिएशन नुसार मागच्या आठवड्यात सुरुवातीला सोन्याचा भाव 47627 रुपये होता.त्यात शुक्रवारी वाढ होऊन 48017 प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा भाव 60351 रुपयांनी वाढून 61 हजार 859 रुपये प्रति किलोग्रॅम झाला.

.MCX वर फेब्रुवारी साठी दहा ग्राम सोन्याचा दर 66 रुपयांच्या वाढीसह 47 हजार 844 रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर98 रुपयांच्या वाढीसह 61 हजार 701 रूपये प्रति किलोग्राम इतका आहे. सराफ बाजार मध्ये शुक्रवारी 24 कॅरेट शुद्ध त्याच्या सोन्याचा दर चार हजार 814 रुपये प्रतिक्रिया होतात तर 22 कॅरेट सोन्याचा दर चार हजार 698 रुपये प्रति ग्राम होता.

घरबसल्या जाणून घ्या मिस कॉल द्वारे सोन्याचे भाव

 तुम्हाला सोन्याचे भाव घरबसल्या जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही 8955664433 या नंबर वर मिस कॉल दिला तर तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किमती बद्दल मेसेज येतो त्यामध्ये तूम्ही सोन्याच्या भावाबद्दल सविस्तर माहिती जाणू शकता.(संदर्भ-News 18 लोकमत)

English Summary: today gola and silver market rate is growth know todays market rate of gold
Published on: 17 January 2022, 01:58 IST