खगोलीय घटना या तशा खगोल प्रेमींसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी कुतूहलाच्या असतात. आपल्याला माहित आहेच की, बऱ्याचदा अशा घटना पाहायला मिळतात की त्यावर विश्वास बसत नाही.
कुठल्याही पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण आकाराचा दिसतो हे सगळ्यांना माहिती आहे. आज वटसावित्री पौर्णिमा असून आज चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर एवढे तेवढे नव्हे तब्बल 27 हजार पाचशे किलोमीटरने कमी होणार आहे.
हे अंतर कमी झाल्यामुळे चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने मंगळवारी आकाशात सुपरमुन चे दर्शन खगोलप्रेमींना आणि सगळ्यांना घेता येणार आहे. याचा आनंद सगळ्यांना मंगळवार आणि बुधवार अशा दोन्ही दिवशी घेता येणार आहे.
जर आपण भौगोलिक दृष्ट्या चंद्राचेपृथ्वीपासूनचे अंतराचा विचार केला तर ते तीन लाख 84 हजार 400 किलोमीटर एवढे आहे.
परंतु हे अंतर वट सावित्री पौर्णिमेला तब्बल 27 हजार 500 ने कमी होऊन तीन लाख 56 हजार पाचशे किमीवर येणार आहे. त्यामुळे चंद्राचा आकार सहाजिकच 14% मोठा व 30 पट नेहमीपेक्षा अधिक प्रकाशित आज चंद्र दिसणार आहे.
जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हाच्या सुपरमुनचे दर्शन ते डोळ्याचे पारणे फेडणारे असेल. आज चंद्रोदयाचा कालावधी पाहिला तर तो जवळजवळ सव्वा सात असा आहे. त्यामुळे उगवताना क्षितिजाजवळ चंद्र विलोभनीय मोठा आणि प्रकाशमान दिसणार आहे.परंतु सध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण असल्याने
येणाऱ्या या विलक्षण प्रसंगावर विरजण पडण्याची देखील दाट शक्यता आहे. अर्थात तुम्ही संपूर्ण रात्रीत म्हणजे उद्या पहाटे सव्वा सहा पर्यंत आणि विलोभनीय दृश्य पाहू शकणार असून 15 जून रोजी रात्री 8.25 मिनिटांनी पुन्हा आकाशात सुपरमून पाहता येणार आहे.
नक्की वाचा:EPFO Update: तुमच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये येतील 40 हजार रुपये, वाचा सविस्तर तपशील
Published on: 14 June 2022, 08:59 IST