Others News

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील जैवतंत्रज्ञान केंद्र,

Updated on 21 June, 2022 6:47 PM IST

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील जैवतंत्रज्ञान केंद्र, वनस्पतीशास्त्र विभाग व जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान प्रद्योगिक मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील वाशिम व आशादायी जिल्यातील ग्रामीण भागात उती संवर्धित रोपांचे बळकटीकरण या तंत्रावर आधारित कौशल्य व उद्योजकता विकास हा दोन वर्षाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्प अंतर्गत विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. आर. एम. गाडे,

अधिष्ठाता कृषी डॉ. वाय. बी. तायडे, विभाग प्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग डॉ. आर. बी. घोराडे यांच्या मार्गदरशनाखाली डॉ. एस. बी. साखरे, प्रभारी अधिकारी, जैवंत्रज्ञान केंद्र व डॉ. डी. आर. राठोड सहाय्यक प्राध्यपक, जैवंत्रज्ञान केंद्र, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला यांच्या प्रमुख पुढाकाराने सदर एक दिवसीय उती संवर्धन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये डॉ. आर. बी. घोराडे (विभाग प्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग), डॉ. एस. बी. साखरे (प्रभारी अधिकारी, जैवंत्रज्ञान केंद्र), डॉ. एम. पी. मोहरील (सहाय्यक प्राध्यापक, जैवंत्रज्ञान केंद्र), 

डॉ. पी. व्ही. जाधव (सहाय्यक प्राध्यापक, जैवंत्रज्ञान केंद्र), डॉ. डी. आर. राठोड (सहाय्यक प्राध्यापक, जैवंत्रज्ञान केंद्र) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदर कार्यशाळा ही प्रत्यक्ष पार पडली असून कार्यशाळेचा मुख्य उद्देश विदर्भातील वाशिम व आशादायी जिल्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उती संवर्धित रोपांचे बळकटीकरणचे तंत्र व प्रकिया प्रत्यक्ष समजावणे हा होता. या कार्यशाळेचा लाभ वाशिम जिल्यातील २० ग्रामीण व युवा शेतकऱ्यांनी घेतला.या प्रात्यक्षिक कार्यशाळेमध्ये विशेष मार्गदर्शक म्हणून डॉ. डी. आर. राठोड (सहाय्यक प्राध्यापक, जैवंत्रज्ञान केंद्र) यांचे उती संवर्धित रोपांचे

बळकटीकरण तंत्रज्ञान या विषयावर मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. बी. एस. मुंढे (कनिष्ठ संशोधन सहाय्यक, जैवंत्रज्ञान केंद्र) यांनी उती संवर्धनाची प्रक्रिया या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक डॉ. एस. बी. साखरे (प्रभारी अधिकारी), जैवंत्रज्ञान केंद्र, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला व आभार प्रदर्शन डॉ. दिपीका पडोळे (सहायक प्राध्यापिका), जैवंत्रज्ञान केंद्र, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला यांनी केले. सदर कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता जैवंत्रज्ञान विभागातील तांत्रिक सहाय्यक कु. प्राजक्ता वि. शेळके व आश्विन मो. हेरोडे यांचे सहाय्य लाभले.

English Summary: Tissue culture lessons taken by farmers in Washim district
Published on: 21 June 2022, 06:47 IST