Others News

येत्या एक जुलै रोजी केंद्रसरकारच्या कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात AICPIनिर्देशांक 127 अंकांच्या वर पोहोचला आहे.महागाई मध्ये वाढ झाल्याने महागाई भत्त्यात देखील वाढ होण्याची अपेक्षा वाढली आहे.

Updated on 23 June, 2022 7:55 AM IST

 येत्या एक जुलै रोजी केंद्रसरकारच्या कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.  एप्रिल महिन्यात AICPIनिर्देशांक 127 अंकांच्या वर पोहोचला आहे.महागाई मध्ये वाढ झाल्याने महागाई भत्त्यात देखील वाढ होण्याची अपेक्षा वाढली आहे.

मीडिया रिपोर्टचा विचार केला तर त्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढ होऊ शकतो.

जर हा महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढला तर कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 39 टक्के होईल. या अनुषंगाने कर्मचार्‍याच्या पगारात 34 हजारहुन अधिक वाढ होऊ शकते.

 जानेवारीमध्ये डिए 34% करण्यात आला

 सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून जानेवारीमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 31 वरून 34 टक्के करण्यात आला होता. एनआयसीपीआय निर्देशांकात वाढ झाल्यानंतर हे घडले.

नक्की वाचा:महत्वाचे! आधार आणि मतदान कार्डलिंक करणे आवश्यक,अशा पद्धतीने करा तुमचे मतदान कार्ड आधारला लिंक

जर यामध्ये एप्रिल महिन्याचा विचार केला तर किरकोळ चलनवाढ 7.79टक्क्यांवर आहे जो आठ वर्षांतील नीचांक आहे.

हा निर्देशांक 2022 च्या पहिल्या दोन महिन्यांसाठी म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये घसरला होता.  जानेवारीमध्ये 125.1 तर फेब्रुवारीमध्ये 125 नंतर मार्चमध्ये 1 पॉईंट ने वाढून 126 वर पोहोचला.

एप्रिल महिन्याच्या आकडेवारीचा विचार केला तर, ए आय सी पी आय निर्देशांक 127.7 वर आला आहे.  त्यामध्ये 1.35 टक्के वाढ झाली आहे म्हणजे आता मे आणि जून चा डेटा 127 च्या पुढे गेला तर डीए पाच टक्‍क्‍यांनी वाढू शकतो.

नक्की वाचा:7th pay commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या महिन्यापासून 'इतका' वाढणार पगार

 असे झाले तर पगार किती वाढणार?

एक जुलैपासून कर्मचाऱ्यांचा डीए वाढू शकतो असे म्हटले जात आहे. पूर्वी 34 टक्के महागाई भत्ता मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 39 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56 हजार 900 रुपये आहे. जर कर्मचाऱ्यांना 39 टक्के महागाई भत्ता मिळाल्यावर त्यांना 22191 रुपये डीए मिळेल.

सध्या 34 टक्के दराने एकोणावीस हजार 346 रुपये मिळत आहेत. यामध्ये पाच टक्के महागाई भत्ता वाढल्याने पगारात  2845 रुपयांची वाढ होईल.

म्हणजे या सगळ्या हिशोबाने विचार केला तर वर्षाला 34 हजार 140 रुपयाची वाढ होणार आहे. हा निर्णय झाला तर त्याचा फायदा 50 लाखांपेक्षा जास्त सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

नक्की वाचा:विमा कंपनीला दणका; २०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा

English Summary: through 7th pay commition can da growth by five percent
Published on: 23 June 2022, 07:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)