Others News

मित्रांनो या कोरोनाच्या काळात अनेक सुशिक्षित युवकांच्या नोकऱ्या गेल्यात, तर काहीनी आपल्या चांगल्या नोकरीचा आरोग्याच्या कारणावरून त्याग केला आणि आपल्या गावाकडे आले. देशात बेरोजगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि हि एक चिंतेची बाब आहे.

Updated on 17 November, 2021 9:41 PM IST

मित्रांनो या कोरोनाच्या काळात अनेक सुशिक्षित युवकांच्या नोकऱ्या गेल्यात, तर काहीनी आपल्या चांगल्या नोकरीचा आरोग्याच्या कारणावरून त्याग केला आणि आपल्या गावाकडे आले. देशात बेरोजगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि हि एक चिंतेची बाब आहे. 

त्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या सुशिक्षित तरुणांनी व्यवसाय करणे हि काळाची गरज बनली आहे तसे अनेक युवा व्यवसायाकडे वळत आहेत तर काही युवक व्यवसायाकडे वळू पाहत आहेत. काही युवकांना व्यवसाय करायचा आहे पण त्यांना कोणता व्यवसाय करावा हे सुचत नाही कल्पना सुचत नाही त्याच विशेषता ग्रामीण भागातील युवकांसाठी आज कृषी जागरण काही व्यवसायाची माहिती घेऊन आले आहे. चला तर मग जाणुन घेऊया गावात राहून कोणते बिजनेस केले जाऊ शकतात आणि चांगली कशी त्यातून मोठी कमाई हि केली जाऊ शकते.

गावात राहून करा हे व्यवसाय

गावात राहून अनेक व्यवसाय करता येऊ शकतात, आज आम्ही त्यापैकी काही व्यवसायाची माहिती आपणांस सांगत आहोत. या माहितीच्या आधारे आपण देखील कोणता व्यवसाय करायचा याचा एक अंदाज बांधू शकता आणि मग आवडीचा बिजनेस निवडू शकता आणि चांगली मोठी कमाई करू शकता. चला तर मग जाणुन घ्या सविस्तर.

जन औषधी केंद्र

गावात राहून जन औषधी केंद्र खोलून आपण देखील चांगली कमाई करू शकतात शिवाय तुम्ही ह्याद्वारे एक जनसेवा करू शकतात. हा बिजनेस सुरु करण्यासाठी आपल्याकडे शॉप उघडण्यासाठी पर्याप्त जागा असणे आवश्यक आहे, आपण भाड्याने देखील जागा घेऊ शकता आणि हा बिजनेस सुरु करू शकता, हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 लाख रुपयाच्या भांडवलची गरज भासेल. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला लोन सुद्धा मिळते त्यासाठी आपल्याला बँकेत अँप्लिकेशन द्यावे लागेल. हा व्यवसाय सुरु करून तुम्ही महिन्याकाठी चांगले उत्पन्न अर्जित करू शकता.

पशु खाद्यचा बिजनेस

जर आपण गावात राहत असाल आणि आपल्याला बिजनेस चालू करायचा असेल तर पशु खाद्य चे दुकान टाकून आपण चांगली कमाई करू शकता. यासाठी आपल्याला एका गाळ्याची गरज लागेल. शिवाय आपल्याला पशु खाद्य आणण्यासाठी गाडी ची व्यवस्था करावी लागेल यासाठी आपल्याला 1 लाख रुपया पर्यंत इन्व्हेस्टमेंट हि करावी लागेल. पशुपालक शेतकरी, कुक्कुट पालन करणारे शेतकरी यांना पशु खाद्यसाठी मोठ्या शहरात जावे लागते जर आपण हे आपल्या गावात चालू केले तर त्या लोकांना सोयीचे होईल आणि तुम्हाला देखील याचा फायदा होईल.

 

 मत्स्यपालन

जर आपण गावात राहत असाल आणि आपल्याकडे शेतजमीन असेल तर आपण मासे पालन करून चांगली कमाई करू शकता. मासेपालन आपण जमीन भाड्याने घेऊन देखील करू शकता यासाठी आपणांस काही दिवस प्रशिक्षण हे घ्यावं लागेल. हा व्यवसाय करण्यासाठी सरकार लोन देखील पुरविते शिवाय आपल्याला यासाठी सबसिडी सुद्धा मिळते. ह्या व्यवसायातून आपण चांगली कमाई करू शकता.

English Summary: three business idea for youngster in rural area
Published on: 17 November 2021, 09:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)