Others News

प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याविषयी काळजी आणि चिंता देखील असते.मूल जन्माला आल्यानंतरते जसजसे मोठे होत जातात तसा तसा त्यांचा खर्च वाढत जातो

Updated on 24 May, 2022 8:46 PM IST

 प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याविषयी काळजी आणि चिंता देखील असते.मूल जन्माला आल्यानंतरते जसजसे मोठे होत जातात तसा तसा त्यांचा खर्च वाढत जातो

मग पुढे चालून त्यांचे शिक्षण, उच्च शिक्षण इत्यादी खर्च पालकांना ते सक्षम होईपर्यंत करावाच लागतो. त्यामुळे बऱ्याचदा  मुलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करता करता पालकांना स्वतःच्या उतारवयात स्वतःसाठी पैसा राहत नाही. या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी मुलं लहान असतानाच  त्यांच्या आर्थिक गरजांसाठी गुंतवणूक सुरू करणे खूप महत्त्वाचे आहे.

मुलांसाठी करायचे गुंतवणूक जितकी लवकरात लवकर करता येईल तितकीसुरुवातीला गुंतवणूक कमी लागते व त्याचा परतावा जास्त मिळतो.तुम्ही योग्य योजनेची निवड केली तर तुमच्या मुलाला तुम्ही तो प्रौढ होईपर्यंत करोडपती देखील बनवू शकतात.जेणेकरून तुमची योग्य गुंतवणूक तुमच्या मुलालात्याचं आयुष्य किंवा त्याचे कारकीर्द स्वतःच्या पैशाने सुरू करता येऊ शकते.साठी आपण काही पर्यायांची  माहिती या लेखात घेऊ.

 लहान मुलांसाठी गुंतवणूक प्लॅन

1- इक्विटी फंड एक उत्तम पर्याय- मुलांच्या सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये तुम्हीदोन किंवा तीनचांगली कामगिरी करणाऱ्या इक्विटी फंड एसआयपी करू शकतात. इक्विटी फंड  हे दीर्घकालीन सर्वात फायदेशीर एक मार्ग किंवा एक पर्याय आहे

. याचं एक उदाहरणच द्यायचे झाले तर जर तुम्हाला मुलाला वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत एक कोटी चा मालक बनवायचा असेल तर तुम्हाला 12 टक्के वार्षिक परताव्याच्या अंदाजा सह प्रति महिना नऊ हजार रुपये गुंतवणूक करावी लागतील.

2- उत्तम चाइल् प्लॅन- या व्यतिरिक्त तुम्ही विमा कंपन्यांच्या एखाद्या उत्तम चाइल्ड प्लान मध्ये देखील इन्वेस्टमेंट करू शकतात. असे  प्लॅन एंडोमेंट आणि युलीप या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असतात. याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रीमियम माफ करण्याचा एक पर्याय आहे म्हणजेच प्रीमियम सुरू असताना पालकांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मृत्यूनंतर विमा कंपनी उर्वरित प्रेमियम भरते आणिनिर्धारित कालावधीनंतर मुलाला इच्छित रक्कम मिळते.

3- तुमच्या मुलाच्या नावाने उघडा पीपीएफ खाते-तुमच्या मुलाच्या नावाने एखाद्या पीपीएफ खाते उघडणे हादेखील एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे.पीपीएफला पंधरा वर्षाचे लॉक इन आहे यामध्ये गुंतवणुकीवर करात सूट देखील मिळते.या गुंतवणुकीवर करात सूट देखील मिळते.या सर्व गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये जास्त परताव्यासाठी इक्विटी फंडांमध्ये जास्तीत जास्त हिस्सा ठेवणे चांगले.

4- सुकन्या समृद्धी योजना- मुलींच्या भविष्यासाठी ही अतिशय चांगली सरकारी योजना असून यामध्ये शून्य ते दहा वर्षाच्या मुलीच्या नावावरही चौदा वर्षांची होईपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर वर्षाला 7.6 टक्के व्याजसह मुलगी 21 वर्षाची झाल्यावर तुम्हाला व्याजासह रक्कम मिळते.

यामध्ये महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मिळणारा परतावा हा निश्चित असतो.(स्रोत-दिव्यमराठी)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Exlusive Offer: 4 जी मोबाईल एक्सचेंज केल्यास जिओफोन नेक्स्ट वर 2000 रुपयांची सूट

नक्की वाचा:Cotton Seeds : राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे बियाणे खरेदीसाठी शेतकरी परराज्यात

नक्की वाचा:Seed News:सोयाबीनचे 'हे' वाण आहेत रोग आणि किडी साठी प्रतिरोधक, सोयाबीनच्या या नव्या वाणांचे संशोधन

English Summary: this useful investment plan benificial for child bright financial future
Published on: 24 May 2022, 08:46 IST