मित्रांनो जर आपण ही भारतीय नागरिक असाल आणि एक पॅनकार्डधारक असाल तर आजची बातमी विशेष आपल्यासाठी. पॅनकार्ड धारक व्यक्तीला आपले पॅन कार्ड 31 मार्च 2022 पर्यंत आधार कार्डशी लिंक करणे आता अनिवार्य केले गेले आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की जर आपण 31 मार्च 2022 पर्यंत आपले पॅन कार्ड आधार लिंक केले नाही तर आपले पॅनकार्ड निरस्त अर्थात डीएक्टिवेट देखील केले जाऊ शकते. यासोबतच 31 मार्च 2022 नंतर पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी आपणास एक हजार रुपये देखील जमा करावे लागणार आहेत.
त्यामुळे जर अद्याप पर्यंत आपण आपले पॅन कार्ड आधार सोबत लिंक केले नसेल तर लवकरात लवकर पॅन कार्ड आधार सोबत लिंक करून घ्यावे अन्यथा आपणास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे, भारतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही अति महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहेत. पॅन कार्ड शिवाय भारतात कोणताच वित्तीय व्यवहार केला जाऊ शकत नाही, एवढेच नाही पॅन कार्ड शिवाय भारतात कुठल्याच बँकेत खाते खोलता येणार नाही त्यामुळे भारतीय नागरिकांसाठी पॅनकार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. पॅनकार्ड बँकेत खाते खोलण्यासाठी, म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करण्यासाठी, आयकर भरण्यासाठी, तसेच वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. त्यामुळे जर आपण सरकारने लावून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही म्हणजे 31 तारखेच्या आत पॅन कार्ड आधार सोबत लिंक केले नाही तर आपले पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते आणि वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींपासून आपणास कदाचित वंचित देखील रहावे लागू शकते. त्यामुळे आज आपण पॅन कार्ड आधारशी कसे लिंक करायचे याविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
ह्या पॅन कार्ड धारक व्यक्तींना द्यावे लागतील 10 हजार
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जर आपण आधार सोबत पॅन कार्ड लिंक केले नाही, तर आपले पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि तरा पण अनावधानाने असे निष्क्रिय पॅन कार्ड कुठेही वापरात आणले तर आयकर अधिनियम 1961 च्या कलम 272N अन्वये, संबंधित मूल्यांकन अधिकारी अशा व्यक्तीस दहा हजार रुपये दंड देण्यासाठी आदेश देऊ शकतो.
या पद्धतीने करा लिंक
पॅन कार्ड आधार सोबत लिंक करण्यासाठी आपणास सर्वप्रथम भारत सरकारच्या आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर आपणास आधार मध्ये दिलेले नाव जसेच्या तसे संबंधित रकाण्यात प्रविष्ट करावे लागेल, या समवेतच पॅन नंबर आणि आधार नंबर देखील भरावा लागणार आहे. एवढ्या केल्यानंतर कॅपच्या कोड प्रविष्ट करावा लागणार आहे. त्यानंतर आपणास लिंक आधार या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. एवढे केल्यानंतर आपले पॅन कार्ड आधार सोबत लिंक केले जाईल.
SMS करून देखील करता येते पॅनकार्ड आधार सोबत लिंक
जर आपणास मेसेज द्वारा पॅन कार्ड आधार सोबत लिंक करायचे असेल तर त्यासाठी UIDPAN असे आपल्या संदेश बॉक्स मध्ये टाईप करून त्यानंतर आपला बारा अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल, त्यानंतर पॅन कार्ड नंबर देखील प्रविष्ट करावा लागणार आहे. आता हा मेसेज 567678 अथवा 56161 या नंबर वर पाठवून द्यावा लागेल. यानंतर आपले पॅन कार्ड आधार सोबत लिंक केले जाईल.
निष्क्रिय पॅनकार्ड कसे चालू करणार
मित्रांनो जर आपले पॅनकार्ड निष्क्रिय केले गेले असेल तर आपण असे पॅनकार्ड पुन्हा चालू करू शकता. यासाठी आपल्या मोबाईलच्या संदेश बॉक्समध्ये आधार सोबत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरने आपला पॅनकार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे पॅनकार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर स्पेस देऊन आपला बारा अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि हा मेसेज 567678 अथवा 56161 या नंबर वर पाठवून द्यायचा आहे. आपले निष्क्रिय पॅनकार्ड पुन्हा एकदा सुरू केले जाईल.
Published on: 23 January 2022, 10:24 IST