Others News

देशात अलीकडे पेट्रोल डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ नमूद करण्यात येत आहे, त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांना आता पेट्रोल चलित बाईक चालवण्यासाठी परवडत नाही, म्हणूनच देशात सर्वत्र इलेक्ट्रिक बाईकची मागणी वाढली आहे. देशात बड्या मोटार निर्मात्या कंपन्या इलेक्ट्रिक बाइकचे निर्माण करीत आहेत. याच यादीत आता क्रेयॉन मोटर्सचे नाव जोडले गेले आहे. या कंपनीने नुकतीच इलेक्ट्रिक स्कूटरलॉन्च केली आहे. क्रेयॉन मोटर्सने लाँच केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला स्नो प्लस असे नाव देण्यात आले आहे. इंडियन इम्मोबिलिटी मेकर यांनी सांगितले की, ही स्कूटर कमी स्पीड वर धावणारी असेल त्यामुळे स्कूटर चालवण्यासाठी लायसन्सची गरज नसणार आहे. स्नो प्लस नामक स्कूटर कमी स्पीडने जरी धावत असली तरीदेखील ती उत्तम मायलेज देत असल्यामुळे मध्यमवर्गीय लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Updated on 11 February, 2022 3:41 PM IST

कंपनीने दावा केला आहे की, ही स्कूटर मात्र 14 पैशात एक किलोमीटरपर्यंत धावण्यास सक्षम आहे. ही स्कूटर अफोर्डेबल असल्यामुळे मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंत बनू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटर ची डिझाईन आणि फीचर्स अद्ययावत असल्यामुळे ही स्कूटर स्कूटर चालकास उत्तम फिल देण्यास सक्षम आहे. क्रेयॉन मोटर्सने अधिक माहिती देताना सांगितले की, आगामी काही दिवसात 70 किलोमीटर पासून ते 130 किलोमीटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच कंपनी द्वारा लॉन्च करण्यात येणार आहेत, या येत्या काही दिवसात लॉन्च होणाऱ्या स्कूटर हाय स्पीड वर धावणाऱ्या असतील असे देखील कंपनीने म्हटले आहे. या स्नो प्लस इलेक्ट्रिक स्कूटर ची एक्स शोरूम किंमत 64 हजार रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर ग्राहकांच्या आवडीनुसार 4 कलर मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. 

फेयरी रेड, सनशाइन येलो, क्लासिक ग्रे आणि सुपर व्हाइट या 4 कलर मध्ये कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या स्कूटर ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कंपनीने या स्कूटर वर दोन वर्षांची वॉरंटी देखील दिली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ची टॉप स्पीड मात्र ताशी 25 किलोमीटर एवढीच आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला कमी स्पीड असल्याकारणाने या इलेक्ट्रिक स्कूटरची कुठेच रजिस्ट्रेशन करावे लागत नाहीत तसेच त्याला चालवण्यासाठी कोणतेही लायसन्स अनिवार्य नसते. ही स्कूटर 250-वॅटच्या BLDC मोटरसह येते, जे की या स्कूटरला उच्च वेगाने क्रूज साठी पीक पॉवर आउटपुट देते. 

स्कूटरला ट्यूबलेस टायर आणि डिस्क ब्रेक मिळतात.  या ई-स्कूटरला 155 मिमी ग्राउंड क्लीयरन्ससह आहे. ड्रायव्हिंग रेंज अद्याप कंपनीने उघड केलेली नाही. स्नो+ या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, सेंट्रल लॉकिंग, मोबाइलसाठी यूएसबी चार्जिंग पोर्ट, अँटी थेफ्ट मेकॅनिझम आणि नेव्हिगेशन (जीपीएस) सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. स्कूटरला मोठा बूट मिळतो, असे कंपनीचे म्हणणे आहे.

English Summary: this scooter run one kilometer in 14 paise
Published on: 11 February 2022, 03:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)