Others News

मित्रांनो अनेक लोक गुंतवणूक करण्याचा विचार करतात पण गुंतवणूक करणे हे थोडे रिस्की असल्याने लोकांना गुंतवणूक करण्यात भीती वाटते. पण डोन्ट वरी! घाबरायचं काही कारण नाही भारतीय पोस्ट आपल्यासाठी एक विशेष योजना घेऊन आले आहे. ह्या योजनेत गुंतवणूक हि रिस्क फ्री आहे, तसेच हि एक सरकारी संस्था असल्याने इथे गैरव्यवहार होऊ शकत नाही.

Updated on 26 November, 2021 8:39 PM IST

मित्रांनो अनेक लोक गुंतवणूक करण्याचा विचार करतात पण गुंतवणूक करणे हे थोडे रिस्की असल्याने लोकांना गुंतवणूक करण्यात भीती वाटते. पण डोन्ट वरी!  घाबरायचं काही कारण नाही भारतीय पोस्ट आपल्यासाठी एक विशेष योजना घेऊन आले आहे. ह्या योजनेत गुंतवणूक हि रिस्क फ्री आहे, तसेच हि एक सरकारी संस्था असल्याने इथे गैरव्यवहार होऊ शकत नाही.

मित्रांनो आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती स्कीम आहे पोस्ट ऑफिसची MIS स्कीम. ह्या योजनेत आपण एकदा गुंतवणूक करून प्रत्येक महिन्याला व्याज प्राप्त करू शकता. ह्या योजनेत अकाउंट हे 10 वर्षावरील मुलांचे खोलले जाऊ शकते. ह्या योजनेत आपण आपल्या मुलांच्या नावाने अकाउंट खोलून गुंतवणूक करू शकता आणि त्यातून व्याजरूपाने प्राप्त होणारा पैसा हा आपण त्याच्या शिक्षणासाठी वापरू शकता. आहे ना लई भारी योजना चला तर मग जाणून घेऊया याविषयी अधिक.

 कुठे खोलणार खातं

जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला आधी अकाउंट ओपन कराव लागेल. आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट ओपन करू शकता. ह्या योजनेत आपण हजार रुपयापासून ते साडे चार लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता. वर्तमानमध्ये ह्या योजनेसाठी 6.6 टक्के व्याजदर हा गुंतवणूकदाराला मिळणार आहे.

जर आपल्या मुलाची वय हे 10 वर्षापेक्षा कमी असेल तर आपण आपल्या स्वतःच्या नावाने अकाउंट खोलू शकता. ह्या योजनेची मॅच्युरिटी हि पाच वर्ष आहे. त्यानंतर याला बंद केले जाऊ शकते.

 जाणुन घ्या ह्या योजनेचे गणित

समजा, आपण ह्या योजनेत 2 लाख रुपये गुंतवणूक केली तर आपल्याला वर्षाला 13200 रुपये व्याज भेटेल म्हणजे महिन्याला तुम्हाला 1100 रुपये व्याज हे भेटेल. हि स्कीमची म्यॅच्युरिटी हि पाच वर्ष आहे,

म्हणजे 2 लाख रुपयाला 66 हजार रुपये व्याज आपल्याला मिळेल आणि स्कीम च्या शेवटी म्हणजे पाच वर्षानंतर आपली मुद्दल परत देखील केली जाईल. ह्या पैशाचा आपण आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी उपयोग करू शकता. ह्या योजनेत जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये गुंतवणूक केले जाऊ शकतात जर आपण साडेचार लाख रुपये गुंतवलेत तर आपल्याला 2475 रुपये महिन्याला व्याज मिळेल. त्यामुळे हि स्कीम एक फायद्याचा सौदा आहे असे सांगितले जात आहे.

English Summary: this post office investment scheme is benificial for child education
Published on: 26 November 2021, 08:39 IST