Others News

आजकालच्या तरुणांचा ओढा हा व्यवसायाकडे जास्त वळताना दिसत आहे. कारण दरवर्षी बेरोजगार तरुणांचे प्रमाण वाढतच आहे. नोकऱ्यांचा विचार केला तर ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती चाललेली आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय मध्ये उतरून आणि खास करून युवा शेतकऱ्यांनी शेतीसोबतच एखाद्या व्यवसायात उतरले तर आर्थिक प्रगती होण्यापासून त्यांना कोणी थांबवूशकत नाही. परंतू व्यवसाय सुरू करण्याअगोदर सगळ्यात मोठी समस्या उद्भवते ती आपल्याकडे असलेल्या भांडवलाची.

Updated on 27 September, 2021 2:36 PM IST

 भांडवल नसेल तर आपल्याला व्यवसाय करताच येत नाही असे काही आहे का? तर तसेकाय नाही तुम्ही भांडवल नसतांना देखील अनेक  पद्धतीने व्यवसाय उभारू शकता. असा व्यवसाय कोणत्या पद्धतीने उभा करता येईल ते या लेखात पाहू.

तुम्ही उभारू शकणार या व्यवसायासाठी गुंतवणूकदार शोधणे

 तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल आणि तुम्ही त्याची निवड केली तर तुम्हाला त्यासंबंधीचे सगळे माहिती असणे आवश्यक आहे. तसेच तो व्यवसाय तुम्ही किती चांगल्या पद्धतीने करू शकता हे गुंतवणूकदारांना आत्मविश्वासाने सांगता आले पाहिजे. जर एखाद्या गुंतवणूकदाराला तुमच्या व्यवसायाची कल्पना आवडली तर ते पैसे गुंतवण्यास तयार होतात. याला आपण स्टार्टअपफंडिंगअसे म्हणू शकतो. यामध्ये महत्त्वाचे असे असते की गुंतवणूकदार त्याचा पैसा तो अशा ठिकाणी गुंतवणार ज्या ठिकाणाहून त्याला परतावा मिळण्याची गॅरंटी असते.

ब्रोकर किंवा एजंट होणे

 जर तुमच्याकडे पैसा नसेल किंवा एखाद्या व्यवसायाची उत्तम कल्पना नसेल किंवा गुंतवणूकदार  पैसे गुंतवायला तयार नसतील तर तुम्ही एखाद्या कंपनीसाठी कमिशन बेसिसवर काम करू शकता.तुम्ही अशा काही कंपन्यांना किंवा व्यावसायिकांना जॉईन होऊ शकता ज्यांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कमिशन बेसिसवर एजंट हवी असतात.यामध्ये तुम्हालाभांडवलाची गुंतवणूक करावी लागत नाही. तुम्ही त्या लोकांना त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी क्लाइंट मिळवून देऊ शकता त्या बदल्यात तुम्हाला ठरलेले पैसे मिळतात.

फ्रीलान्सर म्हणून काम करणे

 जर तुमच्याकडे मार्गदर्शन, भाषण व स्पष्टीकरण, चित्रपट आणि व्हिडिओ उत्पादन, लेखन, संगणक प्रोग्राम इन, वेब डिझाईनिंग सारखे कौशल्य असेल तर  तुम्ही या क्षेत्रात एक रुपयाही न खर्च करता स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. अनेक व्यावसायिकांकडे स्वतःचे कर्मचारी नसतात ते असे फ्रीलान्सर ठेवणे पसंत करतात.फ्रीलान्सिंग वर्क मध्ये आपण स्वतःचेटाईम मॅनेजमेंट  नुसार काम करू शकतो.

English Summary: this occupation start in less investment or without investment
Published on: 27 September 2021, 02:36 IST