पॅन कार्ड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि मतदान कार्ड हे चार कागदपत्रेहे खूप आवश्यक आहेत.या चारही कागदपत्रांचे विशिष्ट अशा कामासाठी संबंध असून यातील पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाते हे आपल्याला माहिती आहे. बऱ्याच प्रकारच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
समजा तुम्ही बँकेमध्येएखादा व्यवहार करतात किंवा एका दिवसात रुपये पन्नास हजार पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार असेल तर पॅन कार्ड आवश्यक आहे. आपल्याला माहित आहेच कि पॅन कार्ड म्हणजेच अल्फान्यूमेरिक दहा अंकी नंबर असतो.
म्हणजेच भारतातील जेवढे आयकर दाते आहेत त्यांचा एक ओळख क्रमांक आहे. यावर संबंधित व्यक्तीच्या नाव, त्याची जन्मतारीख आणि त्याचा एक फोटो असतो. यामध्ये शासनाचा एक नियम आहे की एका व्यक्तीला फक्त एकच पॅन कार्ड दिले जाते.
कोणतीही व्यक्ती एकापेक्षा जास्त पॅन कार्ड काढू शकत नाही.परंतु जर एखाद्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त पॅन कार्ड काढले तर अशा व्यक्तीला दंड भरावा लागू शकतो व या बाबतीत आयकरचा एक विशिष्ट कायदा आहे. तो म्हणजे आयकर कायदा 1961 च्या कलम 272 बी अंतर्गत एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवले तर संबंधित व्यक्तीस दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाण्याची शक्यता असते.
त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असेल तर त्याने ते पटकन सरेंडर करणे गरजेचे असून पुढील कारवाई पासून वाचता येऊ शकते.
नक्की वाचा:ऐकलंत का मंडळी..! प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेतून दरमहा ३,००० रुपये पेन्शन मिळणार, 'या' ठिकाणी असा करा अर्ज
Published on: 12 September 2022, 11:55 IST