Others News

मित्रांनो अनेक लोकांचे गुंतवणुकीचे स्वप्न असते, आपल्या पुढील आयुष्यात पैशांची चणचण भासू नये किंबहुना आपले म्हातारपण सुखात जावे या हेतूने अनेक लोक गुंतवणूक करण्याचे स्वप्न उराशी बाळगत असतात. परंतु लोकांना गुंतवणुकीत असलेली रिस्क मोठी धोक्याची वाटते त्या अनुषंगाने आज आम्ही आपल्यासाठी एलआयसी या सुरक्षित इन्शुरन्स कंपनीची एक भन्नाट पॉलिसी याविषयी माहिती घेऊन आलो आहोत.

Updated on 06 March, 2022 1:06 PM IST

मित्रांनो अनेक लोकांचे गुंतवणुकीचे स्वप्न असते, आपल्या पुढील आयुष्यात पैशांची चणचण भासू नये किंबहुना आपले म्हातारपण सुखात जावे या हेतूने अनेक लोक गुंतवणूक करण्याचे स्वप्न उराशी बाळगत असतात. परंतु लोकांना गुंतवणुकीत असलेली रिस्क मोठी धोक्याची वाटते त्या अनुषंगाने आज आम्ही आपल्यासाठी एलआयसी या सुरक्षित इन्शुरन्स कंपनीची एक भन्नाट पॉलिसी याविषयी माहिती घेऊन आलो आहोत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की एलआयसी देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी म्हणून ओळखली जाते. या एलआयसीची (LIC's Jeevan Lakshya Policy) एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी ही एक असे भन्नाट पॉलिसी आहे ज्याद्वारे आपण रोजाना नाममात्र पैसे गुंतवून लखपती बनू शकता. या पोलिसीत आपण रोजाना 172 रुपये गुंतवणूक केली तर आपणास मॅच्युरिटी वर तब्बल 28 लाख 50 हजार रुपये प्राप्त होणार आहेत. आहे ना भन्नाट! चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या भन्नाट पॉलिसीचे भन्नाट फीचर्स.

पॉलिसीविषयी थोडक्यात- ही एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी एक नॉन-लिंक्ड, सहभागी, वैयक्तिक, जीवन विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकाला वार्षिक उत्पन्न लाभ मिळतो.  यामुळे कुटुंबाच्या आणि विशेषत: मुलांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले गेले आहे.  या पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी कधीही पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसाला एकरकमी रक्कम मिळत असते, त्यामुळे या ठिकाणी गुंतवणूक सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. तुम्ही ही पॉलिसी किमान रु. 1 लाखाच्या मूळ विम्यासह घेऊ शकता.

तथापि, कमाल विम्याच्या रकमेवर मर्यादा नाही. जर तुम्हाला ही पॉलिसी घ्यायची असेल, तर तुम्ही ती पॉलिसी 13-25 वर्षांच्या मुदतीसह घेऊ शकता. तुम्हाला पॉलिसीच्या मुदतीपेक्षा तीन वर्षे कमी कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता. या पॉलिसीसाठी किमान वय 18 वर्षे ठेवण्यात आले आहे.  या पॉलिसीमध्ये प्रवेश करण्यासाठी कमाल वय 50 वर्षे एवढे आहे. पॉलिसी मॅच्युर होण्यासाठी कमाल वय 65 वर्षे आहे.

असे मिळणार 28 लाख- एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, जर 29 वर्षांचा व्यक्ती 15 लाख रुपयांच्या विम्याची रक्कमसह 25 वर्षांसाठी ही पॉलिसी घेतो, तर मॅच्युरिटीच्या वेळी त्याला दुप्पट बोनस मिळाल्यावर 28.50 लाख रुपये मिळू शकतात.

28 लाखासाठी एवढा भरावा लागेल प्रीमियम- एखाद्या व्यक्तीने 15 लाखांच्या विम्याची रक्कम घेऊन ही पॉलिसी घेतली आणि 25 वर्षांची पॉलिसीची मुदत निवडली, तर त्याला 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, अशा व्यक्तीला दरमहा 5,169 रुपये म्हणजेच सुमारे 172 रुपये दिवस या प्रमाणे प्रीमियम जमा करावा लागेल. पहिल्या वर्षी प्रीमियमवर 4.5 टक्के आणि दुसऱ्या वर्षापासून 2.25 टक्के जीएसटी भरावा लागेल.  पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला एकरकमी 16.5 लाख रुपये मिळतील.

English Summary: this lic policy is very helpful as this provide 28 lakh on maturity
Published on: 06 March 2022, 01:06 IST