महाराष्ट्रातील गेल्या दहा ते अकरा दिवसांपासून सुरू असलेला सत्ता संघर्षावर अखेर काल पडदा पडला. 30 जून च्या संध्याकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
खरे पाहायला गेले तर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी घोषणा केल्यानंतर स्वतः सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते.
परंतु शपथ विधी कार्यक्रमाच्या काही वेळा अगोदरच भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांनी फडणवीस यांना सरकारचा भाग बनवणार असल्याचे सांगितले. नंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण मुख्यमंत्रिपदानंतर एखाद्या कनिष्ठ म्हणजे छोटे पद स्वीकारणे ही एक फार मोठी गोष्ट आहे.
जर आपण महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला तर याआधी सुद्धा अशा घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. ते आपण जरा पाहू.
नक्की वाचा:ईडा पिडा टळू दे आणि बळीचे राज्य येवुदे! कृषी दिनाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री पदानंतर छोटे पद स्वीकारणारे मुख्यमंत्री
1- शिवाजीराव पाटील निलंगेकर हे जून 1985 ते मार्च 1986 या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. परंतु नंतर 2004 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या सरकारमध्ये ते महसूल मंत्री झाले.
2- त्यासोबतच काँग्रेसचे नेते शंकरराव चव्हाण हे 1975 या वर्षात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले.या पदावर ते दोन वर्ष आरुढ होते.
परंतु नंतर सत्ता बदल होऊन त्यांच्या जागी वसंत दादा पाटील यांना मुख्यमंत्री करण्यात आले. 1978 मध्ये वसंत दादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शरद पवार यांनी सरकार पाडले आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले. तेव्हा या सरकार मध्ये शंकरराव चव्हाण अर्थमंत्री झाले होते.
3-शिवसेनेत असताना नारायण राणे 1999 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले.एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी त्यांनी हे पद भूषवले.
त्यानंतर त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये महसूल मंत्री झाले.
4- आता देवेंद्र फडणवीस यांनी या इतिहासाची पुनरावृत्ती केली असून देवेंद्र फडणवीस 2014 ते 2019 पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते.
त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्या पाठिंब्याने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले.
परंतु अगदी तीन दिवस राहिलेल्या या सरकारला बहुमत अभावी राजीनामा द्यावा लागला व आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कालच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
नक्की वाचा:...आणि एका फोनवर सूत्र हलली! उपमुख्यमंत्री पदी फडणवीसांच्या आधी ठरलेलं हे नाव..
Published on: 01 July 2022, 12:28 IST