Others News

आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रां पैकी एक असून आधार कार्ड शिवाय आता कोणत्याही प्रकारचा योजनेचा लाभ किंवा सरकारी काम होऊ शकत नाही. जर आपण असे म्हटले की प्रत्येकच ठिकाणी आधार आता गरजेचे झाले आहे तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कागदपत्राची प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी घेत असते.

Updated on 22 September, 2022 12:46 PM IST

आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रां पैकी एक असून आधार कार्ड शिवाय आता कोणत्याही प्रकारचा योजनेचा लाभ किंवा सरकारी काम होऊ शकत नाही. जर आपण असे म्हटले की प्रत्येकच ठिकाणी आधार आता गरजेचे झाले आहे तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कागदपत्राची प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी घेत असते.

नक्की वाचा:बातमी कामाची! आधार क्रमांक नाही, तरीही तुम्ही सहजपणे -आधार डाउनलोड करू शकता! प्रक्रिया माहिती करून घ्या

प्रत्येकाला आधार कार्ड हरवण्याची किंवा त्याचा कोणीही गैरवापर तर करणार नाही ना अशी भीती असते व बरेच जण आधार कार्ड सोबत बाळगत नाही.

परंतु यासाठी तुम्ही आधार कार्डची वर्च्युअल कॉपी अर्थात पीडीएफ फाईल निशुल्क डाऊनलोड करू शकता. याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे व्हर्च्युअल आधार कार्ड आता सर्वत्र ठिकाणी वैध मानले जाते. त्यामुळे या महत्त्वपूर्ण असलेल्या वर्च्युअल आधार कसे डाऊनलोड करावे हे समजून घेऊ.

 अशा पद्धतीने करा डाऊनलोड

1- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम युआयडीएआयच्या संकेतस्थळ uidai.gov.in वर जावे लागेल.

2- या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या 'माय आधार' विभागांमध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेल्या डाउनलोड आधार या पर्यायावर क्लिक करावे.

नक्की वाचा:मतदान कार्ड बनवायचं का? मग घरबसल्या तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर असा करा अर्ज, मतदान कार्ड काही दिवसातच तुमच्या घरी येणार

3- यानंतर तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्टचा कोड नमूद करावा आणि त्यानंतर सेंड ओटीपी  वर क्लिक करावे. त्यानंतर तुमचा आधार शिल्लक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो व तो संबंधित बॉक्स मध्ये नमूद करावा व त्यानंतर डाउनलोड आधार वर क्लिक करावे.

4- आधार डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि जन्माचे वर्ष टाकून हे डाउनलोड झालेली वर्च्युअल आधार अर्थात पीडीएफ फाईल उघडू शकतात.

 तुमचे नवीन आधार कार्ड ऑफलाइन देखील बनवू शकतात

 जर तुम्हाला नवीन आधार कार्ड ऑनलाईन करायचे नसेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील बनवू शकता त्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागते व तिथे जाऊन तुम्ही तुमची नवीन आधार कार्ड सहजरीत्या बनवू शकतात.

नक्की वाचा:Important: 'ही' बँक देत आहे शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत, वाचा नेमकी काय आहे योजना?

English Summary: this is the easy download process of virtual adhaar copy on your mobile
Published on: 22 September 2022, 12:46 IST