सध्या बर्याच प्रकारचे गुंतवणूक प्लान बाजारात आहे. बरेच जण एलआयसी, म्युचल फंड्स, प्रॉपर्टी यामध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूक करताना प्रत्येक ठिकाणी थोड्या अधिक प्रमाणात रिस्कअसतेच. गुंतवणूक करताना प्रत्येक जण चांगल्या परताव्याची अपेक्षा ठेवून गुंतवणूक करत असतात.
याच अपेक्षेला साजेशी अशी पोस्ट ऑफिस ची एक योजना आहे. या योजनेबद्दल या लेखात माहिती घेऊ.
पोस्ट ऑफिसची महत्वपूर्ण योजना
पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते हे तुमच्यासाठी फार योग्य असेल. यामध्ये तुम्हाला वार्षिक 6.6 टक्के व्याज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक हजार रुपयांमध्ये खाते उघडता येते. जर तुमचे एकच खाते असेल तर तुम्ही जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये जमा करू शकतात. जरतुमचे संयुक्त खाते असेल तर त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त नऊ लाख रुपये जमा करू शकतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे योजना पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या संपूर्ण पैसे परत मिळतात.
या योजनेचा मॅच्युरिटी पिरीयड
या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड पाच वर्षाचा आहे. पाच वर्षानंतर तुम्ही तुमचे पैसे त्यात पुन्हा गुंतवू शकतात. म्हणजेच योजना पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या संपूर्ण जमा पैसे मिळतात. जे तुम्ही पुन्हा या योजनेत गुंतवू शकतात आणि मासिक उत्पन्न राखु शकतात. या योजनेच्या गुंतवणुकीवर 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळते दरवर्षी मिळणारे व्याज हे 12 महिन्यात विभागले जाते आणि तुम्हाला ती रक्कम दरमहा मिळते. जर तुम्ही प्रति महिन्याला पैसे काढले नाही तर ते तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात राहतात आणि हे पैसे मूळ रकमेस जोडल्यास तुम्हाला आणखी व्याज मिळते. तुम्ही मॅच्युरिटी पूर्वे ही या योजनेतून पैसे काढू शकतात. खात्याला एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा उपलब्ध आहे. जर तुमचे खाते एक वर्ष ते तीन वर्षासाठी जुनी असेल तर त्यात जमा केलेल्या रकमेतून दोन टक्के वजा केल्यावर उरलेली रक्कम परत मिळते आणि खाते तीन वर्षांपेक्षा जुनी असेल तर एक टक्के वजा केल्यावर शिल्लक रक्कम परत केली जाते.
परतावा किती मिळतो?
या योजने जर तुम्ही साडे चार लाख रुपये गुंतवलेल्या असेल तर तुम्हाला वार्षिक 29 हजार 700 रुपये म्हणजेच 2 हजार 475 रुपये प्रति महिना वार्षिक 6.6 टक्के व्याज दराने व्याज मिळते. जर तुम्ही जॉइंट अकाउंट मध्ये नऊ लाखांची गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला वार्षिक 59 हजार चारशे रुपये म्हणजेच चार हजार 950 रुपये प्रति महिना व्याजमिळेल.
या योजनेत कोण उघडू शकते खाते?
या योजनेमध्ये खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडता येते आणि तीनप्रौढ व्यक्तींच्या नावानेही जॉइंट अकाउंट उघडतायेते. पालकांच्या देखरेखीखाली दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर ही खाते उघडता येते.(स्त्रोत-दिव्यमराठी)
Published on: 22 January 2022, 05:40 IST