Others News

शेतकऱ्यांना शेती करीत असताना शेतीच्या विविध कामांसाठी पैशांची नितांत गरज असते. खास करून जेव्हा खरीप किंवा रब्बी हंगाम येतो,तेव्हा हंगामाच्या सुरुवातीला पैसे हे आवश्यक लागतात. परंतु बऱ्याचदा शेतकरी राजांच्या हातात पैसा असेलच असे नाही. त्यामुळे बँकांच्या माध्यमातून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना अक्षरशा हेलपाटे मारावे लागतात. परंतु बँक पीक कर्ज वेळेवर देईलच याची देखील शाश्वती नसते.

Updated on 05 September, 2022 3:35 PM IST

शेतकऱ्यांना शेती करीत असताना शेतीच्या विविध कामांसाठी पैशांची नितांत गरज असते. खास करून जेव्हा खरीप किंवा रब्बी हंगाम येतो,तेव्हा हंगामाच्या सुरुवातीला पैसे हे आवश्यक लागतात. परंतु बऱ्याचदा शेतकरी राजांच्या हातात पैसा असेलच असे नाही. त्यामुळे बँकांच्या माध्यमातून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना अक्षरशा हेलपाटे मारावे लागतात. परंतु बँक पीक कर्ज वेळेवर देईलच याची देखील शाश्वती नसते.

त्यासाठी शेतकऱ्यांना नाईलाजास्तव सावकारांच्या दाराशी जावे लागते.परंतु केंद्र सरकारच्या काही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळतो. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे किसान क्रेडिट कार्ड होय.

नक्की वाचा:महत्वाचे! 'या' योजनेअंतर्गत सामूहिक शेततळ्यासाठी शंभर टक्के अनुदान, वाचा सविस्तर माहिती

 आपल्याला माहित आहेच कि या कार्डच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना आवश्यक खते, पेरणी साठी लागणारे बियाणे व कीटकनाशके इत्यादी कृषी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी कर्ज दिले जाते.

किसान क्रेडिट कार्ड हे बँकांमार्फत देण्यात येते. या अंतर्गत दोन ते चार टक्के इतके स्वस्त दरात कर्ज उपलब्ध होते. परंतु त्यासाठी कर्जाची परतफेड देखील वेळेत करणे गरजेचे आहे.

 स्टेट बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अशा पद्धतीने करा घरबसल्या अर्ज

 जर तुम्ही स्टेट बँकेच्या ग्राहक असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये स्टेट बँकेचे योनो ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला स्टेट बँकेच्या योनोची अधिकृत वेबसाइट ओपन करणे गरजेचे असून त्यानंतर तुम्हाला शेतीचा पर्याय यामध्ये दिसतो.

नक्की वाचा:फुले संगम सोयाबीन चे व्यवस्थापन रस शोषक किडी, जास्त प्रमाणात वाढ, पिवळी पडणे, रोग व्यवस्थापन

 या पर्यायावर जेव्हा तुम्ही जाल त्यानंतर तुम्हाला अकाउंटचा पर्याय सिलेक्ट करावे लागतो. त्यानंतर तुम्हाला केसीसी अर्थात किसान क्रेडिट कार्ड रिव्ह्यू या सेक्शनमध्ये जाऊन त्यानंतर या पर्यायावर क्लिक करावे

लागते.त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती बिनचूक भरावी लागेल व त्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होतो.यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी लागत नाही.

 यामध्ये बँकांची भूमिका

जेव्हा कुठलेही कर्ज तुम्ही बँकेमध्ये घ्यायला जाल तर तेव्हा संबंधितांची वेरिफिकेशन केले जाते. अगदी त्याच पद्धतीने शेतकऱ्याची देखील पडताळणी बँक करते.

यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या महसूल नोंदी तपासल्या जातात तसेच त्याच्या ओळखीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो इत्यादी आवश्यक असते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे कुठल्याही बँकेची थकबाकी नसल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यायला लागते.

नक्की वाचा:Scheme Update: जर तुम्हाला मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही 'या' गटात असाल तर करा 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज

English Summary: this is online process can get sbi kisan credit card easily and fast
Published on: 05 September 2022, 03:35 IST