सध्याच्या कठीण काळात नियमित उत्पन्नाची प्रत्येकालाच गरज आहे. याशिवाय सर्वांनाच आपल्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करायची आहे.
सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्न हवे असल्यास पोस्ट ऑफिस ची मंथली इन्कम स्कीम हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
या योजनेमध्ये फक्त 1 हजाररुपयांची गुंतवणूक करता येते. याशिवाय तुम्हाला सिंगल आणि जॉईंट असे दोन्ही प्रकारचे खाते उघडण्यास सुविधा मिळते या स्कीम द्वारे तुम्ही दर महिन्याला 5 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवू शकता. कसे उघडायचे खाते आणि काय आहेत या स्कीम चे वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
एकरकमी पैसे जमा करून मिळवा दरमहा उत्पन्न
पोस्ट ऑफिस च्या एमआयएस मध्ये तुम्ही एकरकमी पैसे जमा करून तुमच्यासाठी मंथली इन्कम ची व्यवस्था करू शकता. या योजनेची खासियत अशी आहे की स्कीम मॅच्युअर्ड झाल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व पैसे परत देखील मिळतील. पोस्ट ऑफिस च्या मंथली इन्कम योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फक्त 1 हजार रुपयात खाते उघडता येते. जर तुमचे खाते सिंगल आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त 4.5 लाख रुपयापर्यंत पैसे जमा करता येतात. जर तुमचे जॉईन खाते असेल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपयापर्यंत रक्कम जमा करता येते.
1) मुलांच्या नावाने देखील उघडू शकता खाते :
पोस्ट ऑफिस च्या मंथली इन्कम स्कीम मध्ये तुम्ही मुलांच्या नावेदेखील खाते उघडू शकता. अर्थात यासाठी मुलाच्या आई-वडिलांना किंवा गार्डियनला या खात्यावर देखरेख करावी लागेल. मुलगा किंवा मुलगी दहा वर्षाची झाल्यानंतर ते स्वतः हे खाते चालवू शकतात. या खात्याची पूर्ण जबाबदारी तो मुलगा किंवा मुलगी कायद्याने सज्ञान झाल्यानंतर मिळेल. पोस्ट ऑफिस च्या मंथली इन्कम स्कीम मध्ये खाते उघडण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क करू शकता.
2) पोस्ट ऑफिस च्या मंथली इन्कम स्कीम शी संबंधित इतर मुद्दे:
पोस्ट ऑफिस च्या मंथली इन्कम खात्याच्या मॅच्युरिटी चा कालावधी 5 वर्षाचा असतो. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा कालावधी दर 5 वर्षांनी पुढे वाढवू शकता. जर तुम्हाला मॅच्युरिटी च्या आधीच पैसे काढायचे असतील तर यासाठी या योजनेत सुरू केलेले खाते किमान एक वर्ष जुने झालेले आहे. म्हणजेच खाते उघडल्यानंतर एक वर्षांनी तुम्ही रक्कम काढू शकता. त्याच्या बदल्यात जमा झालेल्या रकमेतून 2 टक्क्याचे शुल्क घेतले जाईल.
तर खाते सुरू झाल्यानंतर 3 वर्षांनी रक्कम काढल्यास 1 टक्के शुल्क कापले जाईल.
3) दर महिन्याला कसे मिळतील 5 हजार :
पोस्ट ऑफिस च्या मंथली इन्कम स्कीम अंतर्गत तुम्हाला 6.6 टक्के व्याज दिले जाते. जर तुम्ही सिंगल खात्यामार्फत 4.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला सध्याच्या व्याज दरानुसार वार्षिक 29 हजार 700 रुपये मिळतील. जर तुम्ही जॉईंट खाते उघडत नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 59 हजार 400 रुपयाचे वार्षिक व्याज मिळेल. म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला 4,950 रुपयांचा परतावा मिळेल.
Published on: 27 March 2022, 07:03 IST