आता डिजिटल पेमेंटचा जमाना असून प्रत्येक जण छोट्या-मोठ्या ट्रांजेक्शन साठी फोन पे किंवा गुगल पेचा वापर करतात. कारण या डिजिटल पेमेंट अर्थात यूपीआयच्या माध्यमातून ही प्रक्रिया आता सोपी झाली आहे. युपीआय हे 2016 मध्ये लॉन्च करण्यात आले होते व मुख्यतःते पेमेंटसाठी वापरले जाते.या माध्यमातून आता एक व्यक्ती एकापेक्षा जास्त यूपी आयडी बनवू शकते व या यूपीआय आयडी वेगवेगळ्या बँक खात्याशी कनेक्ट केला जाऊ शकतो.
जेव्हा आपण युपीआय आयडी जनरेट करतो त्यावर पत्ता देखील वेगळा असतो आणि हीच खरी सर्वात मोठी समस्या आहे.परंतु हा वेगळा असलेला पत्ता कधी कधी आपल्याला समस्या निर्माण करू शकतो.
कारण वेगवेगळ्या यूपीआयआयडी लक्षात ठेवणेखूप कठीण आहे. यासाठी आपण या लेखात वेगवेगळ्या प्रकारचे यूपीआय आयडी सहजपणे कसे हटवायचे याबद्दल माहिती घेऊ.
'फोन पे' वरील यूपीआय आयडी कसा हटवायचा?
फोन पे वर युपीआय आयडी सामान्यतः 971××××ybl द्वारे जनरेट केला जातो आणि जेव्हा आपण गुगल पे वर यूपी आयडी जनरेट करतो तो तुमच्या नावानुसार केला जातो. जर तुम्हाला फोन पे वरील आयडि हटवायचा असेल तर वरच्या डाव्या बाजूला प्रोफाईल वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला कोणत्या बँकेचा हटवायचा आहे त्या बँक खात्यावर क्लिक करावे लागेल. जेव्हा तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल तेव्हा तुम्हाला यूपीआय आयडी विभागातील सर्व आयडी दिसतात. उजव्या बाजूला तुम्हाला डिलीट बटण दिसेल. या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा यूपीआय आयडी सहज हटवू शकतात.
नक्की वाचा:संकटाची मालिका सुरुच; आता 'केना' गवतामुळे शेतकरी मेटाकुटीला
गुगल पेवर आयडी कसा हटवायचा?
गुगल पे वर आयडी हटवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला गुगल पे ॲप वर गेल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या प्रोफाईल वर जाऊन तिथे बँक खात्याला क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला कोणता बँक यूपी आयडी हटवायचा आहे त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला यूपीआय आयडी 'व्यवस्थापित करा' यावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्ही सर्व यूपीआय आयडी पाहू शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला यूपीआय आयडी च्या बाजूला डिलीट बटन दिसेल. यामुळे नकोसे असलेले यूपीआय आयडी हटवल्यामुळे दुस-याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर होण्याचा धोका टळतो.
नक्की वाचा:आगीतून उठून फुफुट्यात! पेट्रोल परवडत नाही म्हणून CNG गाडी घेतली, आणि CNG ११६ वर गेला..
Published on: 03 August 2022, 10:21 IST