Others News

आता पावसाळा सुरु होऊन जवळजवळ एक महिना होत आला. जेव्हा पावसाचे प्रमाण वाढते तेव्हा बऱ्याच प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. कारण ठिकठिकाणी पाणी साचते, घराच्या अवतीभोवती ओलसरपणा जास्त प्रमाणात असतो.

Updated on 30 June, 2022 3:02 PM IST

आता पावसाळा सुरु होऊन जवळजवळ एक महिना होत आला. जेव्हा पावसाचे प्रमाण वाढते तेव्हा बऱ्याच प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. कारण ठिकठिकाणी पाणी साचते, घराच्या अवतीभोवती ओलसरपणा जास्त प्रमाणात असतो.

ही सगळी परिस्थिती डासांचा प्रादुर्भाव वाढण्याला निमंत्रण देते. आपल्याला माहित आहेच की, डासांच्यामुळे विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका संभवतो.

त्यामुळे या डासांपासून स्वतःचा व कुटुंबाचे रक्षण करणे खूप गरजेचे असते. डासांपासून संरक्षण मिळवण्याकरता बाजारामध्ये विविध प्रकारचे कॉइल्स वगैरे उपलब्ध असतात.

एवढेच नाही तर काही स्प्रे सुद्धा येतात.परंतु यामध्ये रसायनांचा वापर केला असल्यामुळे आरोग्याला ते हानिकारक ठरू शकतात.

त्यामुळे काही सोपे घरगुती उपाय केले तर डासांपासून मुक्ती मिळत असेल तर त्यांचा वापर हा फायद्याचा ठरू शकतो. या लेखात आपण डासांपासून मुक्ती मिळवण्याच्या काही घरगुती उपायांची माहिती घेऊ.

नक्की वाचा:महाराष्ट्रातील खरीप पेरणी असमाधानकारक; राज्य सरकार घेणार पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा

 हे उपाय करतील डासांपासून संरक्षण

1- विविध वनस्पतीचा वापर- विविध प्रकारच्या औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती यासाठी उपयोगी ठरू शकतात. अशा काही प्रकारच्या वनस्पती आहेत की,

त्यांचा उग्र दर्प  म्हणजेच वास डासांना सहन होत नाहीत. यामध्ये आपण लेमनग्रास, लव्हेन्डर प्लांट किंवा रोझमेरी किंवा तुळशीचे रोप हे डासांना मारण्यासाठी खूप उपयोगाचे आहे.

तुम्ही घराच्या प्रवेश द्वारा त्याच्यासमोर तुळशी लावू शकता. कारण या ठिकाणाहूनच डास घरात प्रवेश करतात.

नक्की वाचा:पतंग वर्गीय किडींचा ट्रायकोग्रामा मित्र किटकाच्या मदतींने नायनाट

2- कापूर ठरेल उपयोगी- कापूर से संबंधित उपाय ही एक नैसर्गिक थेरपी असून डासांपासून सुटका होण्यासाठी बऱ्याच कालावधीपासून ती वापरली जात आहे.

कापूर चे अनेक उत्पादने बाजारामध्ये मिळतात, त्याच्या वापराने डास मारणे शक्य आहे. बाजारात मिळणाऱ्या कापूर च्या गोळ्या वापरू देखील या पासून आराम मिळू शकतो. नाहीतर कापून घेऊन तो गरम पाण्यात टाकला तरीडासांपासून मुक्ती मिळू शकते.

3- कडुलिंबाचे तेल- डासांचा त्रास कमी होण्यासाठी घरामध्ये किंवा आजूबाजूला  पाणी साचू देऊ नये किंवा कोणतीही घाण असू नये. कडुलिंबाचा तेलाचा वापर केला तरी डासांपासून मुक्तता मिळू शकते.

यासाठी  अंगाला कडुलिंबाचे तेल लावणे सोयीस्कर ठरते किंवा खोबरेल तेलात कडुलिंबाचे तेल मिसळून खोलीत जाळून टाकू शकता.

नक्की वाचा:पोटॅशियम शोनाइट' आहे पीक उत्पादन वाढीतील महत्त्वाचे खत, जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि वापरायची पद्धत

English Summary: this is easy and benificial remedy for prevention from mosquito
Published on: 30 June 2022, 03:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)