Others News

पॅन कार्ड ला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत एकतीस मार्च 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तथापि तुमचा आधार लिंक न करता तुमचा पॅन चालू ठेवण्याची अंतिम मुदत एक एप्रिल 2022होती.

Updated on 02 June, 2022 2:21 PM IST

 पॅन कार्ड ला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत एकतीस मार्च 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तथापि तुमचा आधार लिंक न करता तुमचा पॅन चालू ठेवण्याची अंतिम मुदत एक एप्रिल 2022होती.

त्याअर्थी तुम्हाला आता पॅन आधार लिंक करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने 29 मार्च 2022 रोजी च्या अधिसूचनेत म्हटले होते की, आता पॅन आधार लिंक करण्यासाठी शुल्क भरावे लागेल.

 पैसे द्यावे लागतील

 तुम्ही तीस जून दोन हजार बावीस रोजी व त्यापूर्वी तुमचा पॅन आधार लिंक केल्यास पाचशे रुपये शुल्क भरावे लागेल. एक जुलै दोन हजार बावीस रोजी किंवा नंतरपॅन आधार लिंक पूर्ण केल्यावर एक हजार रुपये शुल्क लागेल म्हणजे आता वेळेनुसार शुल्काची विभागणी केली जाते.

नक्की वाचा:मोठी बातमी! कोरोना रुग्ण वाढत चालल्याने मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

 पॅन आधार कार्ड लिंक

1- जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले असेलतर तुम्ही या लिंक वर क्लिक करून तुमची स्टेटस तपासू शकता. सर्वप्रथम प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट www.incometaxindiaefilling.gov.in वर जा. त्यानंतर तेथे नवीन वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/portal च्या तळाशी  लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.

2-तुमचे स्टेटस पाहण्यासाठी हायपर लिंक वर क्लिक करा.येथे तुम्हाला तुमचा आधार आणि पॅन कार्ड तपशील भरावा लागेल.

नक्की वाचा:या' राज्याने बासमती भातावर फवारणी करण्यात येणाऱ्या या 10 कृषी रसायनांवर घातली बंदी, जाणून घेऊ कारणे

3- जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक असेल तर तुम्हाला हे पुष्टीकरण दिसेल की तुमचा पॅन आधार क्रमांकाशी जोडला गेला आहे.

4- जर तुम्ही अजून पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर तुम्हाला https://incometaxindiaefiling.gov.in/home या लिंक वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर आधार लिंक वर क्लिक करावे लागेल.

5- त्यानंतर तुम्हाला या संकेतस्थळावर विचारलेला तुमचा तपशील भरावा लागेल आणि तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल.

  एसएमएसच्या माध्यमातून पॅन कार्ड आधार कार्ड लिंक

 तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एसएमएस सेवेचा वापर करून देखील लिंक करू शकता. आधार ला 567678 किंवा 56161वर मेसेज पाठवून पॅन कार्ड ची लिंक केले जाऊ शकते.

नक्की वाचा:अंबानी, बच्चन, तेंडुलकर आणि अक्षयकुमार हे पुणे जिल्ह्यातील 'या' डेअरीचे दूध पितात..!

English Summary: this is an easy and secure online process of aadhar card and pan card link
Published on: 02 June 2022, 02:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)