मुलांमध्ये नोकरी आणि त्यानंतर लग्न हा ट्रेंड समाजात आहे. परंतु सध्या एकंदरीत समाजाची परिस्थिती पाहिली तर मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे म्हणजे फार महाकठीण काम झाले आहे.
पालकांच्या मुलांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या असून लग्नाच्या बाबतीत बऱ्याच अशा समस्या निर्माण होत आहेत. तसेच नोकरी मिळणे देखील पाहिजे तेवढे सोपे नाही. शिक्षण घेऊन देखील वेळेवर चांगली नोकरी मिळेल त्याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. म्हणजे एकंदरीत पाहिले तर नोकरी आणि लग्न या टप्प्यावर तरुणाची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु आता या सगळ्या समस्या वर एका कंपनीने उपाय काढला असून ही कंपनी मला चांगली नोकरी तर उपलब्ध करून तेथेच शिवाय तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर शोधून देण्यात देखील मदत करते. विशेष म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या पगार मध्ये वाढ देखील ती कंपनी देते. या लेखात आपण या कंपनीची माहिती घेऊ.
ही आहे अनोखी कंपनी
मीडिया रिपोर्टनुसार, ग्लोबल टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रोव्हायडर कंपनी श्री मूकाम्बिका इन्फो सोल्युशन्स आपल्या अविवाहित कर्मचाऱ्यांना त्यांचा लाईफ पार्टनर शोधण्यासाठी मदत करते.
राज्यातील मदुराई येथील शाखेत कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी ही विशेष सुविधा सुरु केली असून या कंपनीची स्थापना 2006 मध्ये शिवकाशी येथे सुरू झाली होती. त्यानंतर या कंपनीने 2010 मध्ये मदुराई मध्ये आपली नवी शाखा सुरू केली. दुसऱ्या कंपनीचा वार्षिक टर्न वर पाहिला तर तो शंभर कोटींच्या घरात आहे.
याबाबतीत कंपनीच्या सीईओ यांचे म्हणणे
याबाबतीत कंपनीचे सीईओ सेलवागणेश यांनी सांगितले की सुरुवातीला कंपनीला कर्मचारी शोधण्यासाठी अडचणी आल्या. त्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांना विशेष सुविधा देण्याबाबत प्लॅनिंग केला व तसं काही खास सुविधा सुरू केले. त्यामुळे कंपनीला चांगले स्टाप मिळाला व कंपनीची कामगिरी सुधारली. आमचा आणि कर्मचाऱ्यांचा नातं एखाद्या कुटुंबात सारखा आहे कंपनीतील सगळे कर्मचारी मला मोठा भाऊ मानतात असल्याचे त्यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की कंपनीत काम करणारे सगळे एम्प्लॉईज गावातून दूरच्या ठिकाणहुन येतात. तसेच आई-वडील हे गावाकडे राहत असल्याने त्यांना लग्नासाठी जोडीदार शोधणे मध्ये खूप अडचणी निर्माण होतात. त्यावेळी आम्ही अलायन्स मेकर्स च्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांसाठी वधू-वर शोधण्यास मदत करतो.
या लग्नात कंपनीतील सर्व कर्मचारी जातात व सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लग्न होताच संबंधित कर्मचाऱ्यांचा पगार देखील वाढवला जातो असे देखील सेलवागणेश यांनी म्हटले.(स्रोत-tv9मराठी)
महत्वाच्या बातम्या
Published on: 09 May 2022, 12:16 IST