किसान क्रेडिट कार्डचे काय फायदे होतात हे सर्वांना माहिती आहे. पण केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचं याची माहिती तुम्हाला याची माहिती आहे का? जर तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आपल्याला किसान क्रेडिट कार्ड त्वरीत मिळेल. पीएम किसान योजनेच्या पोर्टेलवर जाणून आपण किसान क्रेडिट कार्ड तयार करु शकतात. दरम्यान किसान क्रेडिट कार्डसाठी कोणते कागदपत्र आवश्यक असतात. याची माहिती घेणार आहोत.
किसान क्रेडिट कार्ड योजना नाबार्डने (नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट) निर्धारित केली आहे आणि त्यानंतर भारतातील सर्व प्रमुख बँकांनी पाठपुरावा केला आहे. केसीसी ऑफर करणाऱ्या काही शीर्ष बँका आहेत. त्यात भारतीय स्टेट बँक, पंजाब नेशनल बँक, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक.
किसान क्रेडिट कार्डवरील व्याजदर बँकेनुसार बदलू शकतात. तथापि, बहुतेक बँका सरकारी योजनांनुसार व्याज करत असतात आणि उप-कर्जे देत असतात.
हेही वाचा :किसान क्रेडिट कार्ड असेल तर मिळेल कमी व्याजदरात कर्ज; कार्डसाठी असा करा अर्ज
किसान क्रेडिट कार्ड अर्ज करण्यासाठी पात्रता अटी
सर्व शेतकरी जे एकटे काम करतात तसेच शेती किंवा शेतीत अधिक लोकांसह एकत्र काम करतात
मालक व इतर शेती करणारे लोक.
सर्व भाडेकरु शेतकरी किंवा तोंडी पट्टेदार आणि शेतीतील भागदार यांचाही यात समावेश असून हेही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात
किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) साठी आवश्यक कागदपत्रे
- पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टची फोटोकॉपी इत्यादी.
- ओळखीचा पुरावा
- आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त आयडी सारख्या पत्त्याचा पुरावा.
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
- योग्य पद्धतीने भरलेला व स्वाक्षरी केलेला अर्ज.
अर्जदारांनी लक्षात घ्यावे की बँकेच्या अंतर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार कागदपत्रे आणि इतर औपचारिकता बदलू शकतात. वरील यादीमध्ये केवळ काही मूळ कागदपत्रे समाविष्ट आहेत.
Published on: 09 October 2020, 03:20 IST