जगात मोठ्या प्रमाणात आता EV अर्थात इलेक्ट्रिक वेहिकलंचा वापर वाढत चालला आहे. देशात देखील मोठ्या प्रमाणात एलेक्ट्रिक वेहिकल वापरात आणली जात आहे. हुवावे कंपनीने नुकतीच आपली महत्त्वाकांक्षी कार चीनमध्ये लॉन्च केली. या कंपनीने चीनमध्ये इलेक्ट्रिकल व्हेईकल तयार करण्यासाठी SERES या कंपनीसोबत भागीदारी केली होती. आता हुवावे कंपनीने भागीदारी केलेल्या कंपनीच्या मदतीने Aito M5 ही कार लॉन्च केली आहे. ही कार हुवावेच्या HarmonyOS या ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करणारी पहिली कार आहे.
या कारची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही कार हायब्रीड आहे अर्थात ही कार वीज आणि इंधन दोन्हीवर चालते. हुवावे कंपनीने Aito M5 या गाडीचा डिलिव्हरी इव्हेंट नुकताच आयोजित केला होता. हुवावे Aito M5 ही एक मेडीयम आकाराची SUV आहे. चीनमध्ये Aito M5 ची किंमत 249,800 युआन अर्थात 30 लाख 39 हजार 951 रुपये पासून सुरू होते आणि या मॉडेलची फ्लॅगशिप कारची किंमत 319,800 युआन 38 लाख 91 हजार 818 रुपये पासून सुरू आहे.
मित्रांनो या कारसाठी 25 फेब्रुवारीपासून प्री-बुकिंग सुरू झाले आहे, आणि अवघ्या 4 दिवसांत 6500 युनिट्सचा टप्पा पार केला होता. प्री-बुकिंगच्या दृष्टीने हा खूप चांगला आकडा असल्याचा दावा विशेषज्ञ करत आहेत. ही स्मार्ट कार 1.5T चार-सिलेंडर श्रेणी विस्तारक द्वारे समर्थित आहे, जी श्रेणी विस्तार प्रणालीसाठी डिझाइन केली गेली आहे. यात 15:1 चे कॉम्प्रेशन रेशो आणि 41 टक्के उच्च थर्मल कार्यक्षमता आहे.
Aito M5 बद्दल असा दावा करण्यात आला आहे की, ही कार एकदा चार्ज केल्यावर तब्बल 1100 किलोमीटरपेक्षा जास्त धावू शकते. त्यामुळे ही कार अनेक दिग्गज कंपन्यांच्या EV कारला टक्कर देणार असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप पर्यंत कंपनीद्वारे भारतात कार लॉन्चिंगचा कुठलाच निर्णय बघायला मिळालेला नाही. ग्लोबल मार्केटमध्ये देखील या कारची केव्हा एन्ट्री होणार याबाबत कंपनीने खुलासा केलेला नाही. त्यामुळे या कारची मोठी उत्सुकता लागली असल्याचे समजत आहे.
Published on: 09 March 2022, 10:25 IST