Others News

आपल्या भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर यामध्ये कंप्यूटर बाइक्स ला सर्वाधिक मागणी आहे. कारण या प्रकारच्या बाईक्स या कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात तसेच मायलेज च्या बाबतीत देखील त्या उत्तम आहेत.

Updated on 05 February, 2022 1:21 PM IST

आपल्या भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर यामध्ये कंप्यूटर बाइक्स ला सर्वाधिक मागणी आहे. कारण या प्रकारच्या बाईक्स या कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात तसेच मायलेज च्या  बाबतीत देखील त्या उत्तम आहेत.

 आज आपण या लेखांमध्ये एक लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या बाईक विषयी माहिती घेणार आहोत.

 या आहेत स्पोर्टी बाईक

  • होंडा यूनिकॉर्न- त्या बाईकची किंमत एक लाख रुपये आहे. ही कंपनीच्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या दुचाकी पैकी एक आहे. या बाइक्स मध्ये 162.7 सीसी इंजिन देण्यात आले आहे.हे इंजिन 13bhp पावर आणि 14Nm टॉक जनरेट करते. या बाईकचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत जोडलेली आहे. युनिकॉर्न मध्ये ट्यूबलेस टायर, अनलॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंजिन स्टॉप स्विच  ABS सह फ्रंट डिस्क ब्रेक सारखे वैशिष्ट्य देण्यात आले आहेत.
  • बजाज पल्सर 150- या बाईकची सुरुवातीची किंमत एक लाख रुपये( एक्स शोरूम ) आहे. या बाईकला 149.5 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 14bhp पावर आणि 13Nm टॉर्क जनरेट करते. या बाईची इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स सोबत जोडलेले आहे. ही बाईक नियॉन सिंगल डिस्क आणि ड्युअल डिस्क याव्हेरिअन्टमध्ये उपलब्ध आहे. तसेच यामध्ये हॅलोजन हेडलाईट युनिट, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बॅकलीटस्विच सारखे फिचर्स देण्यात आले.
  • होंडा एसपी 125- या बाईकची किंमत 80 हजार 86 रुपये ते 84 हजार 87 रुपये( एक्स शोरूम)पर्यंत आहे.यामध्ये एलईडी हेडलॅम्पआणि संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कंन्सोल मिळतो. यामध्ये स्पीड, ओडोमीटर,  ट्रीप मीटर गिअर पोझिशन इंडिकेटर,फ्युएल इकोनामी यासारखी माहिती डिस्प्ले होते. या बाईक मध्ये 124 सीसी इंजिन देण्यात आले आहे जे 11bhp आणि 11 Nm टॉक जनरेट करते.
  • या बाईक मध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात येतात. परंतु ग्राहक फ्रंट डिस्क ब्रेकचाही ऑप्शन आपल्याला मिळतो.
  • हिरो ग्लॅमर- या बाईकची सुरुवातीची किंमत 89 हजार 256 ( एक्स शोरूम ) आहे. यामध्ये 124.7 सीसी इंजिन देण्यात आले आहे. ते 10.72bhp पावर आणि 10.6Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स सोबत जोडलेले आहे. यामध्ये एलईडी हेडलाईट, ब्लूटूथ अनेबल्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सिस्टम, साईड स्टँड इंजिन कट ऑफ फंक्शन आणि यूएसबी चार्जर यासारखे फिचर देण्यात आले आहेत.
English Summary: this bike u can get in one lakh rupees that give you stylist look and sporty bike feel
Published on: 05 February 2022, 01:21 IST