Others News

आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोघेही कागदपत्रे कुठल्याही शासकीय कामासाठी नितांत गरजेचे आहेत. कुठल्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी असो की आणखी काही हे दोनही कागदपत्रे लागतात.

Updated on 28 June, 2022 6:50 PM IST

 आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोघेही कागदपत्रे कुठल्याही शासकीय कामासाठी नितांत गरजेचे आहेत. कुठल्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी असो की आणखी काही हे दोनही कागदपत्रे लागतात.

या दोन्ही कागदपत्र बाबतीत महत्वाचे अपडेट आहे की, जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर ते लवकर करणे गरजेचे आहे.

येत्या 30 जून पर्यंत तुमच्या पॅन कार्ड ला आधार कार्डशी लिंक केल्यास पाचशे रुपये, मात्र त्यानंतर एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया करणे फार गरजेचे आहे. तुम्ही स्वतः देखील तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करू शकतात.

 आधार-पॅन लिंकिंग प्रक्रिया

1- तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्स अर्थात  आयकर विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागेल.

2- याठिकाणी क्विक लिंक्स या पर्यायांमध्ये आधार लिंक वर क्लिक करावे.

नक्की वाचा:आता टेन्शन मिटले! ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे तर आता कुठलाही ड्रायव्हिंग टेस्टची गरज नाही,जाणून घ्या नवीन नियम

3- आधार लिंक वर क्लिक केल्यानंतर त्याठिकाणी पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक नमूद करावा व त्यानंतर व्हॅलिडेट वर क्लिक करावे.

4- जर तुमचे पॅन आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पेमेंट साठी एनएसडीएल संकेतस्थळाला भेट देण्याची लिंक दिसेल.

5- या ठिकाणी तुम्हाला चलन नंबर/ आयटीएनएस 280 मधील प्रोसीड या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

6- त्यानंतर जे पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये लागू कर(0021) आयकर ( कंपन्यांव्यतिरिक्त) निवडावे.

7- पेमेंट प्रकारात (500) इतर पावत्या निवडावे लागतील.

8- पेमेंट प्रकारामध्ये नेट बँकिंग आणि डेबिट कार्ड असे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील. यापैकी तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही एक पर्याय निवडू शकता.

9- ज्या ठिकाणी तुम्हाला परमनंट अकाऊंट नंबर असे दिसेल त्या ठिकाणी तुमचा पॅन नंबर नमूद करावा.

10- वर्ष निवडीमध्ये 2023-24निवडावी. ज्या ठिकाणी पत्ता फिल्ड असेल त्या ठिकाणी तुमचा पत्ता नमूद करावा.

नक्की वाचा:महत्वाचे! आधार आणि मतदान कार्डलिंक करणे आवश्यक,अशा पद्धतीने करा तुमचे मतदान कार्ड आधारला लिंक

11- हे सगळं झाल्यानंतर प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर, तुम्ही जी काही माहिती नमूद केली असेल ती तुम्हाला समोर दिसेल.

12- ती माहिती तुम्ही व्यवस्थित तपासल्यानंतर आय ॲग्री त्यावर मार्किंग करतात खूण करावी आणि जमा करा या पर्यायावर क्लिक करा.

13- तुम्ही नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड साठी निवडलेल्या कोणत्याही पर्यायानुसार तुम्हाला संबंधित तुमच्या काळचा तपशील किंवा नेट बँकिंग आयडी पासवर्ड टाकावा लागेल.

14- या ठिकाणी इतर मध्ये 500 व 1000 रुपये भरा. यामध्ये 30 जून पर्यंत पाचशे रुपये शुल्क आकारले जाईल व त्यानंतर एक हजार रुपये शुल्क भरावे लागेल.

15- तुमच्या ट्रांजेक्शन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पीडीएफ मिळेल.  मिळालेली पीडीएफ डाऊनलोड करून तुमच्याकडे ठेवावी.

16- पेमेंट अपडेट होण्यासाठी चार ते पाच दिवस लागतील. त्यानंतर तुम्ही इन्कम टॅक्स संकेतस्थळावर जाऊन  त्या ठिकाणी आधार लिंक वर क्लिक करावे लागेल.

17- नंतर पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक नमूद केल्यानंतर व्हॅलिडेट वर क्लिक करावे.

18- तुमचे पेमेंट अपडेट झाले असेल तर स्क्रीनवर कंटिन्यू चा पर्याय येईल. त्यावर क्लिक करून एक पेज ओपन होईल ज्यामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल.

19- त्यानंतर आय ॲग्री म्हणजेच मी सहमत आहे  करून पुढे जा व या नंतर एक ओटीपी मिळतो. तो मिळालेला ओटीपी इंटर करावा आणि व्हॅलिडेट वर क्लिक करावे.

त्यानंतर एक पॉप अप विंडो उघडेल. त्यामध्ये तुम्हाला तुमची आधार पॅन लिंकिंग ची विनंती यूआयडीएआय कडे पाठवण्यात आली आहे, असे पॉप अप सांगेल.

20- पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा पॅन आणि आधार लिंक केला जाईल.तुम्ही इन्कम टॅक्स वेबसाईटवर जाऊन त्याची स्टेटस चेक करू शकतात.

नक्की वाचा:या' दिवशी येणार -श्रम कार्डधारकांच्या खात्यात पैसे, जाणून घ्या संपूर्ण तपशील

English Summary: thirty june is last date of pancard link with aadhar
Published on: 28 June 2022, 06:50 IST