Others News

सध्या देशात सर्वत्र इंधन दरवाढीचा मध्यमवर्गीय लोकांना मोठा फटका बसत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आगामी काळात विशेषता पाच राज्यातील निवडणुकांचा रिझल्ट लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. देशात सर्वत्र पेट्रोलचे दर शंभरी पार झाले आहेत. म्हणूनच आता इलेक्ट्रिक वेहिकलची मागणी झपाट्याने वाढत आहे.

Updated on 07 March, 2022 1:24 PM IST

सध्या देशात सर्वत्र इंधन दरवाढीचा मध्यमवर्गीय लोकांना मोठा फटका बसत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आगामी काळात विशेषता पाच राज्यातील निवडणुकांचा रिझल्ट लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. देशात सर्वत्र पेट्रोलचे दर शंभरी पार झाले आहेत. म्हणूनच आता इलेक्ट्रिक वेहिकलची मागणी झपाट्याने वाढत आहे.

पेट्रोल स्कूटरपेक्षा आता मध्यमवर्गीय लोक इलेक्ट्रिक स्कूटर अधिक प्राधान्य देत आहेत. भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये अनेक नवीन मोटोकॉर्प कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करीत आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरचे नाक असलेले हिरो देखील इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करीत आहे. देशात सर्वात जास्त हिरोच्या बाईक विक्री होत असतात. मात्र असे असले तरी, इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करणाऱ्या दोन नवीन कंपन्यांनी हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकले आहे. यामुळे हिरो कंपनीची मोठी दमछाक उडत आहे. या दोन कंपन्यांनी ४५५ आणि ४३३ टक्के ग्रोथ केल्याने हिरो इलेक्ट्रिकला घाम फुटला आहे.

एका मिडिया रिपोर्टनुसार, Hero Electric ने गेल्या महिन्यात 7,356 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे.  गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत 235 टक्क्यांनी अधिक वाहणांची विक्री केली आहे, मागील फेब्रुवारी मध्ये म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये हिरोने 2,194 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या होत्या. हिरो कंपनी विक्री मध्ये टॉपवर राहिली मात्र, वार्षिक ग्रोथ मध्ये कंपनी ओकीनवा आणि अँपिअर पेक्षा मागे राहिल्याने सर्वांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. ओकिनावा आणि अँपिअर या दोन इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्या कंपन्यानी इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीमध्ये दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे.

ओकिनावाने फेब्रुवारी 2022 मध्ये 5,923 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली, फेब्रुवारी 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 1,067 युनिटच्या तुलनेत 455 टक्क्यांनी वाढ झाली.  त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावरील अँपिअरने फेब्रुवारी 2022 मध्ये 4,303 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली, जी फेब्रुवारी 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 806 युनिट्सपेक्षा 433 टक्के अधिक आहे. या दोन कंपनीच्या या ग्रोथमुळे हीरो इलेक्ट्रिकची धडधड चांगलीच वाढली असेल, असे सांगितले जात आहे.

English Summary: these two companies sale growth is higher than hero electric know more
Published on: 07 March 2022, 01:24 IST