Others News

राज्यातील रेशन कार्डधारक लोकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जर आपणही रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी आपल्या कामाची आहे. महाराष्ट्र सरकार रेशन कार्ड धारकांची यादी वेळोवेळी अद्ययावत करत असते, रेशन कार्ड धारकांची यादी अद्ययावत करताना महाराष्ट्र सरकारला काही झोल अथवा गडबड आढळून आल्यास संबंधित रेशन कार्ड धारकांची रेशन कार्ड निरस्त केले जाऊ शकते.

Updated on 07 March, 2022 10:58 AM IST

राज्यातील रेशन कार्डधारक लोकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जर आपणही रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी आपल्या कामाची आहे. महाराष्ट्र सरकार रेशन कार्ड धारकांची यादी वेळोवेळी अद्ययावत करत असते, रेशन कार्ड धारकांची यादी अद्ययावत करताना महाराष्ट्र सरकारला काही झोल अथवा गडबड आढळून आल्यास संबंधित रेशन कार्ड धारकांची रेशन कार्ड निरस्त केले जाऊ शकते.

अर्थातच जे रेशन कार्डधारक बऱ्याच कालावधीपासून रेशन भरत नाही अशा रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड देखील निरस्त केले जाऊ शकते. मित्रांनो देशातील गरीब लोकांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अमलात आणली होती या योजनेअंतर्गतचं देशातील तमाम गरीब कुटुंबांना रेशन कार्ड देण्यात आले आहे. रेशन कार्ड मध्ये नमूद केलेल्या सदस्यांच्या आधारावर स्वस्त दरात लोकांना रेशन उपलब्ध करून दिले जाते.

रेशन कार्ड धारक व्यक्ती कोणत्या महिन्याला किती रेशन घेतो, आणि केव्हापासून रेशन घेत नाही या सर्वांची माहिती पुरवठा विभागाकडे असते. त्यामुळे जर रेशन कार्ड धारकाने बऱ्याच काळापासून रेशन भरलेले नसेल तर अशा रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड निरस्त केले जाऊ शकते. मित्रांनो, रेशन घेण्यासंदर्भात शासनाने एक नियम घालून दिला आहे. या नियमांतर्गत जो रेशन कार्डधारक गेल्या सहा महिन्यापासून रेशन भरत नाही त्या रेशन कार्ड धारकाला स्वस्त दरात अन्नधान्याची आवश्यकता नाही आणि म्हणूनच अशी रेशन कार्ड बंद केले जातात. 

मित्रांनो जर, आपले देखील रेशन कार्ड यामुळे निरस्त केले गेले असेल तर आपण ते पुन्हा ऍक्टिव्ह करू शकता यासाठी AePDS च्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्यावी लागते. आपण आपल्या राज्याच्या तसेच देशाच्या AePDS च्या वेबसाईटला भेट देऊन काही तपशील अद्ययावत करून पुन्हा रेशन कार्ड ऍक्टिव्ह करू शकता.

English Summary: these ration card holders ration card will be deactivated by the government
Published on: 07 March 2022, 10:58 IST