पीएम किसान सम्मान निधीचा सातवा हप्ता काल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. बऱ्याच शेतकऱ्यांना दोन हजार जमा झाल्याचे मेसेज मिळाले. परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता जमा झाला नाही. पैसे का जमा झाले नाहीत? त्याचे काय कारणे आहेत, या योजनेचे नियम आणि अटी काय याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
कोणत्या शेतकऱ्यांना नाही मिळणार या योजनेचा फायदा?
तुमच्या नावावर जमीन नाही
जर तुमच्या नावावर शेतजमीन नसेल तर तुम्ही पीएम किसान सम्मान निधि योजना चा फायदा घेऊ शकत नाही. यासाठी तुमच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. जर एखादा शेतकरी शेती करतो, परंतु संबंधित जमीन त्याच्या नावावर नाही तर संबंधित व्यक्ती लाभार्थी यादी मध्ये बसू शकत नाही. जर शेती त्यांच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावे आहे, तर संबंधित व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. जर एखादा व्यक्ती शेत जमिनीचा मालक आहे, परंतु तो सरकारी कर्मचारी किंवा रिटायर झाला आहे किंवा पूर्व खासदार, आमदार, मंत्री राहिला असेल तर त्यांना पीएम किसान योजनेचा फायदा मिळत नाही.
याशिवाय प्रोफेशनल रजिस्टर डॉक्टर, इंजिनीयर, वकील, चार्टर्ड अकाउंटट शिवाय या संबंधित लोकांच्या परिवारातील लोकांना या योजनेचा फायदा मिळत नाही.
दहा हजार पेक्षा जास्त पेन्शन
जर एखादा व्यक्ती शेतीचा मालक असेल, परंतु १० हजार रुपयांपर्यंत सरकारी पेन्शन असेल तर अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत नाही. जे व्यक्ती आयकर रिटर्न भरतात. अशा व्यक्तींना या योजनेचा फायदा मिळत नाही. जमिनीमध्ये पती, पत्नी किंवा नाबालिक मुले यांच्या जवळ संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्या भूमीविषयक रेकॉर्डमध्ये एकत्रित दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असेल ते व्यक्ती छोटे किंवा अल्पभूधारक या व्याख्येत येतात.
कोणाला नाही मिळणार अजून फायदा?
- जमिनीचा वापर शेती कामाशिवाय दुसऱ्या कामासाठी केला जातो.
- गावातील बरेच शेतकरी दुसऱ्या शेतामध्ये शेतीचे काम करतात असे व्यक्ती शेतीचे मालक नसतात. परंतु संबंधित शेताच्या मालकाला धान्य किंवा हिश्यापोटी काही पैसे देतात. असे शेतकरी योजनेचा फायदा घेऊ शकत नाही.
Published on: 26 December 2020, 05:06 IST