भारत हा एक कृषी प्रधान देश असल्यामुळे देशातील सुमारे 90 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीबरोबर शेतकरी काही जोडव्यवसाय करून आपले उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.कारण फक्त शेती करून शेतकरी राजाला परवडत नाही शेतीबरोबर जोडधंदा असणे सुद्धा खूप महत्वाचे असते.प्रत्येक शेतकरी राजा शेतीबरोबर कोणता ना कोणतातरी जोडव्यवसाय करतच असतो. आणि त्यातून तो पैसे कमवत असतो. तर या लेखात आपण शेतीसंलग्न कोणते कोणते व्यवसाय शेतकरी वर्गासाठी फायदेशीर ठरतील याविषयी सविस्तर माहिती घेऊयात.
1)कुकूटपालन व्यवसाय:- सध्या मार्केट मध्ये चिकन ला प्रचंड मागणी आहे. 300 वर्ष्यापासून जगभरात कोंबडी पालन केले जाते. त्यामुळे सध्या मार्केट ची गरज ओळखून कुक्कुटपालन व्यवसाय करून बक्कळ नफा मिळवावा.
2)सेंद्रिय शेती आणि ग्रीन हाउस:- सध्या च्या काळात सेंद्रिय शेतीकडे आणि सेंद्रिय उत्पादनांकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.यासाठीचा ग्रीन हाऊस व्यवसाय केला तर त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आणि तो यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. सध्या बाजारात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने लोक सेंद्रिय शेतीसाठी जमिनीमध्ये गुंतवणूक करीत आहेत. इतर भाज्यांच्या तुलनेत सेंद्रिय भाज्यांच्या किमती सुद्धा जास्त आहेत.
3)मशरूम शेती:- सध्या मशरूम शेती झपाट्याने वाढू लागली आहे. बक्कळ मिळणार फायदा यामुळे मशरूम लागवडीखालील क्षेत्र वाढतच चालले आहे. कमी वेळेतून आणि कमी भांडवलातून मशरूम शेती मधून आपण लाखो रुपये कमवू शकतो.
4)गांडूळ खत, सेंद्रिय खते निर्मिती:- सध्या सेंद्रिय शेती चे महत्व वाढत चालले आहे त्यामुळे शेतीसाठी रासायनिक खतांच्या बदल्यात सेंद्रिय खतांचा वापर केला जातो त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने गांडूळखत आणि सेंद्रिय खते निर्मिती व्यवसाय हा फायदेशीर ठरू शकतो.
5)मत्स्य शेती:- शेतीसाठी योग्य असा पूरक व्यवसाय म्हणून मासे पालनानाला ओळखले जाते. शेतीच्या पाण्यासाठी केलेल्या तलावामध्ये मत्स्य शेती करणे फायदेशीर ठरते. वाढत्या मागणीमुळे बाजारात मत्स्य व्यवसायातून बक्कळ नफा मिळतो.
6)शेळीपालन आणि दुग्धव्यवसाय:-शेतीबरोबर 10 शेळ्या पाळल्या तरी त्यातून आपल्याला वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपयांपर्यंत मिळते. तसेच त्यांच्यापासून मिळणारे खत आणि दूध याच्या विक्रीमधून सुद्धा आपण हजारो रुपये कमवू शकतो. इत्यादी प्रकारचे असंख्य असे शेतीपूरक व्यवसाय आहेत जे बळीराजाला समृद्ध बनवू शकतात.
Published on: 28 January 2022, 04:33 IST