Others News

Edible oil: देशात महागाईने सर्वसामान्य लोकांना हैराण केले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडलेले असतानाच घरगुती गॅस आणि खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. मात्र आता लवकरचं सर्वसामान्यांना खाद्यतेलाच्या किमतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारची तेल कंपन्यांबरोबर बैठक झाली आहे.

Updated on 05 August, 2022 2:37 PM IST

Edible oil: देशात महागाईने सर्वसामान्य लोकांना हैराण केले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडलेले असतानाच घरगुती गॅस आणि खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. मात्र आता लवकरचं सर्वसामान्यांना खाद्यतेलाच्या किमतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारची तेल कंपन्यांबरोबर बैठक झाली आहे.

यामध्ये प्रतिलिटर किमान 10 रुपयांनी दर कमी करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळणार आहे. मात्र, अलीकडे कच्च्या तेलाच्या किमती ३० रुपयांनी कमी झाल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती पुन्हा कमी करण्यात सरकारला यश आले, तर सणासुदीच्या काळातही त्याचा लाभ नागरिकांना मिळेल.

150 रुपयांच्या वर किमती

खाद्यतेलाचे दर अजूनही 150 रुपयांच्या वर आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शेंगदाणा तेलाची किंमत सध्या 187.55 रुपये प्रति लिटर आहे. महिनाभरापूर्वी ते 187.88 रुपये प्रति लिटर होते.

मोहरीचे तेल 173.9 रुपये प्रति लिटर आहे जे महिन्यापूर्वी 178.32 रुपये होते. वनस्पती तेलाचा भाव 155.2 रुपये आहे. महिनाभरापूर्वी तो १६३ रुपये होता.

खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे ट्विट; या दिवशी मिळणार 12व्या हप्त्याची रक्कम

सोया तेलाचा भाव 10 रुपयांनी घसरला

सोया तेलाच्या दरात महिनाभरात 10 रुपयांनी घट झाली आहे. तो 165.5 रुपयांवरून 157.84 रुपये प्रति लिटरवर आला आहे. याच काळात सूर्यफूल तेलाची किंमत 186 रुपयांवरून 171 रुपयांपर्यंत खाली आली आहे. सध्या परदेशात तेलाच्या किमती कमी आहेत. अशा परिस्थितीत भारतातही कमी करण्याची मागणी होत आहे.

एमआरपीमध्ये मोठी कपात

अदानी विल्मारने आपल्या उत्पादनाची एमआरपी 10 रुपयांवरून 30 रुपये प्रति लिटर केली आहे. त्याचप्रमाणे जेमिनी एडिबल अँड फॅट्सनेही त्याचे उत्पादन 8 ते 30 रुपये प्रति लिटरने कमी केले आहे. इमामी अॅग्रीने एमआरपीमध्ये 35 रुपयांपर्यंत कपात केली आहे.

याशिवाय मदर डेअरीनेही आपल्या सर्व खाद्यतेलाच्या किमती प्रति लिटर १५ रुपयांनी कमी केल्या आहेत. यात सोयाबीन तेल आणि राइसब्रान तेलाचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांना हा व्यवसाय करणार मालामाल! कमी गुंतवणुकीत जास्त नफा; होईल बंपर कमाई
MSEDCL: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्यात 24 तास वीज पुरवठा होणार, जाणून घ्या

English Summary: There will be a big fall in the price of edible oil
Published on: 05 August 2022, 02:37 IST