Others News

ग्रामीण भागातून दुधाला घट्ट मलई मिळते पण शहरी भागातील दूध पातळ असते, त्यामुळे घरी फुल क्रीम दूध वापरूनही घट्ट मलई मिळत नाही, अशी महिलांची तक्रार असते. अनेक महिलांची ही तक्रार काही स्टेप्स जाणून घेतल्यास कमी होईल.

Updated on 30 May, 2022 4:40 PM IST

जर तुमच्यासोबत असे होत असेल, आणि दुधावर साई येत नसेल तर तुम्ही दुधावर घट्ट साई येण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करा. या स्टेप्स तुम्ही करून पहिल्या तर नक्कीच दुधावर साई येईल. चला तर मग जाणून घेऊया दुधावर घट्ट मलई/साई कशी बनवायची.

या टिप्स फॉलो करा

दुधामध्ये जास्त पाणी टाकू नका.

दूध घट्ट करण्यासाठी सर्वप्रथम दूध उकळल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करू नका.

उकळलेले दूध पुन्हा २ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा.

जर तुम्ही दुधाचे भांडे झाकण्यासाठी प्लेट वापरत असाल तर हवा सुटण्यासाठी थोडी जागा सोडा.

दूध थंड झाल्यावर न ढवळता फ्रीजमध्ये ठेवा.

काही तासांनंतर तुमच्या लक्षात येईल की दुधावर एक जाड मलई/साई असेल.

आजकाल उत्तम दर्जाचे दुध मिळत नाही, त्यामुळे दुधाची साई येत नाही अशी अनेक महिलांची तक्रार असते, पण आपण वरील स्टेप्स फॉलो केल्यास नक्कीच दुधाची साई आणता येईल.

महत्वाच्या बातम्या
मोदींनी घेतलेल्या साखर निर्यात बंदीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले ...
सुंदर दिसायचेय, अशी घ्या त्वचेची काळजी

English Summary: There is no pus on milk, follow these steps
Published on: 30 May 2022, 04:36 IST