Others News

जमिनीबद्दल चे वाद हे कायम पाहायला मिळतात. जमिनीचे पोट हिस्से तसेच जमिनीचे व्यवस्थित क्षेत्रानुसार एखाद्याकडे क्षेत्रं नसणे त्यामुळे बरेचसे वाद निर्माण होतात. हे वाद मिटवण्यासाठी जमिनीची मोजणी करणे आवश्यक असते. यासाठी चांगला पर्याय म्हणजे शासकीय मोजणी आणणे. या लेखात आपण शासकीय मोजणी ची पद्धत व तिची प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

Updated on 24 August, 2021 4:14 PM IST

जमिनीबद्दल चे वाद हे कायम पाहायला मिळतात. जमिनीचे पोट हिस्से तसेच जमिनीचे व्यवस्थित क्षेत्रानुसार एखाद्याकडे क्षेत्रं नसणे त्यामुळे बरेचसे वाद निर्माण होतात. हे वाद मिटवण्यासाठी जमिनीची मोजणी करणे आवश्यक असते. यासाठी चांगला पर्याय म्हणजे शासकीय मोजणी आणणे. या लेखात आपण शासकीय मोजणी ची पद्धत व तिची प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

 

 जमिनीसाठी शासकीय मोजणी

 जमिनीची शासकीय मोजणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही भूमी अभिलेख विभागाकडे असते व या विभागामार्फत ही मोजणी केली जाते. त्यासाठी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज करावा लागतो. अर्ज तुम्ही ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने करू शकता..

 शासकीय मोजणी साठी अर्ज कसा करावा?

 जमिनीची शासकीय मोजणी करण्यासाठी तुम्ही जो अर्ज भरला त्यासोबत तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा, तसेच मोजणी चा प्रकार म्हणजेच  तातडीची मोजणी,अति तातडीची मोजणी यापैकी एक प्रकार निवडावा लागतो.तसेच वादाचा तपशील द्यावा लागतो

म्हणजेच शासकीय मोजणी का हवी आहे याबाबत तपशीलवार माहिती द्यावी लागते. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर महा भूमी अभिलेख विभागाचे वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ हे संकेत स्थळ तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वापरू शकता.

 अर्ज नंतर ची प्रक्रिया

 अर्ज केल्यानंतर तुम्हाला मोजणी रजिस्टर क्रमांक मिळतो त्यानंतर तुमच्या जमिनीचे पूर्वीचा रेकॉर्ड काढून तुम्हाला भूकरमापक दिला जाईल. हा भूकर मापक तुमच्या शेताच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, जमिनीचे संलग्न लोकांना पंधरा दिवस आधी नोटीस पाठवतो.

यामध्ये ज्या तारखेला मोजणी करायचे आहे त्या तारखेला उपस्थित राहण्या संबंधीची नोटीस असते.भूकर मापकव इतर पाच लोकांच्या समोर तुमच्या जमिनीची मोजणी केली जाते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा सीमा ठरवून दिले जातात.भूकर मापक आधीचे रेकॉर्ड पाहून प्रामाणिकपणे जमीनीची नोंदणी करून देतात.

 ई-मोजणी आज्ञावली मुळे खातेदारांना झालेला फायदा

  • खातेदारअधिकार अभिलेख (7/12) व लगत खातेदारांच्या माहितीसह कार्यालयात उपस्थित राहिल्यास त्याचा मोजणीचा अर्ज संगणकामध्ये नोंद घेतला जातो व त्याला रुपये 3000 च्या वरील रकमेचे मोजणी फी चे चलन किंवा रुपये तीन हजार च्या आतील रकमेची पावती पैसे भरल्यास तात्काळ दिली जाते.
  • अधिकार अभिलेख, मोजणी फी चलनात व पावती व मोजणीचा अर्ज यातील कागदपत्रांच्या आधारे  मोजणीची कार्यवाही पारदर्शकपणे केली जाते.
  • कोषागारात मोजणी फी चे पैसे भरून मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा केल्यास तात्काळ मोजणी अर्जाची पोच दिली जाते.
  • ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीसाठी येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती असते. वरील संपूर्ण प्रक्रियेसाठी खातेदारास हेलपाटे मारावे लागत नाहीत व योग्य, अचूक मोजणी फी खातेदाराकडून घेतली जाते.
  • प्रस्तुत प्रकरणाचे संगणकीय आज्ञावली तून नियंत्रण होत असल्याने ठराविक कालावधीत प्रकरण निकाली काढण्याचे नकळत बंधन आल्याने खातेदारास तत्पर सेवा मिळत आहे. घरबसल्या ही खातेदाराला आपल्या प्रकरणाची सद्यस्थिती समजून घेता येते.
  • योग्य माहिती नमूद केल्यास खातेदाराचा आपल्या प्रकरणात होणारी संभाव्य मोजणी फी सुद्धा आज्ञावली तूनघरबसल्या समजते.
  • एकंदरीत खातेदाराला त्याच्या मोजणी प्रकरणाबाबत कार्यालयात केली जाणारी संपूर्ण कार्यवाही पारदर्शकपणे व वेळेत केली जाणार असल्याची खात्री मिळत आहे
English Summary: the process of goverment land counting
Published on: 24 August 2021, 04:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)