Others News

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी ही गुंतवणूक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. एलआयसीने अनेक उत्तम गुंतवणूक योजना आणल्या आहेत. या गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून चांगला परतावा आणि चांगल्या प्रकारचे विमा संरक्षण मिळते. एलआयसीच्या योजनाही गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत.

Updated on 03 December, 2021 9:03 PM IST

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी ही गुंतवणूक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. एलआयसीने अनेक उत्तम गुंतवणूक योजना आणल्या आहेत. या गुंतवणूक  योजनांच्या माध्यमातून चांगला परतावा आणि चांगल्या प्रकारचे विमा संरक्षण मिळते. एलआयसीच्या योजनाही गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत.

एलआयसी सुद्धा विविध प्रकारच्या विमा आणि गुंतवणुकीचे पर्याय देते. या लेखात आपण एलआयसीच्या काही योजना बद्दल माहिती घेऊ.

  • नवीनविमाबचतयोजना(New Bima Saving Scheme)- एक मनी बॅक योजना आहे. या योजनेमध्ये मुदतपूर्ती नंतर लॉयल्टी सह एकरकमी प्रीमियम परत केला जातो.यात कर्जाची सुविधा देखील आहे. 9,12 आणि पंधरा वर्षाची मुदत पर्याय उपलब्ध आहेत. योजनेच्या मुदतीच्या पहिल्या पाच वर्षात विमाधारकाच्या मृत्यू झाल्यास फक्त प्रीमियमची रक्कम परत केली जाते. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर मृत्यू झाल्यास काही लॉयल्टी जमा असल्यास त्यासह प्रीमियम दिला जातो. न्यू बिमा बचत योजनेतील गुंतवणूकदारांसाठी किमान वयोमर्यादा पंधरा वर्षे तर कमाल वयोमर्यादा पन्नास वर्षेआहे.
  • नवीन जीवन शांती डिफर्ड ॲनुईटी योजना(New Jeevan Shanti Differed Annuity Scheme)- एलआयसी ने सेवानिवृत्तीच्या नंतर पेन्शन सुविधा साठी ही योजना आणली आहे. ही एक नॉन लिंक डिफर्ड ॲनुईटीयोजना आहे.या नवीन योजनेत पॉलिसीसाठी वार्षिक दराची हमी पॉलिसीच्या सुरुवातीस दिली जाते. संयुक्त योजनेसाठी यात किमान दीड लाख रुपये गुंतवावे लागतील.  जे तुमच्या सोयीनुसार वार्षिक,अर्धवार्षिक,तिमाही किंवा मासिक तत्त्वावर देऊ शकता. या योजनेतील किमान वार्षिक पेन्शन बारा हजार रुपये आहे.
  • न्यू चिल्ड्रन मनी बॅक योजना(New Children Money Back Scheme )- एलआयसी ने मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही नवीन योजना दाखल केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी किमान वय 0वर्ष तर कमाल वय 12 वर्षे आहे.याची किमान विमा रक्कम दहा हजार रुपये आहे. प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर पर्याय देखील उपलब्ध आहे. या योजनेची एकूण मुदत 25 वर्षे असून मुल अठरा वर्ष,  वीस वर्ष आणि 22 वर्षाची असेल तेव्हा मूळ रकमेच्या 20 टक्के रक्कम परत दिली जाते.

टीप- कोणतीही गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूक तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

English Summary: the most benificial investment scheme of life insurence corporation
Published on: 03 December 2021, 09:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)