अगोदरच ज्या शेतकर्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणि केसीसी योजनेला लिंक केल्यानंतर दीड कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आला आहे. या मिळालेल्या केसीसी कार्डच्या खर्चाची मर्यादाही १.३५ लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या २४ फेब्रुवारी पासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विशेष प्रकारची मोहीम हाती घेण्यात आली होती.
सरकारने २ लाख कोटी कर्जाची मर्यादा असलेली अडीच कोटी क्रेडिट कार्ड जारी करण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अजून एक कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या लाभार्थ्यांना आता किसान क्रेडिट कार्ड घेणे सोपे झाले आहे. या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांची नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांचा बायोमेट्रिक झाला आहे. तसेच शेतकऱ्यांची शेती, बँक आणि आधार कार्डचे रेकॉर्ड व्हेरिफाय करण्यासाठी बँक शेतकर्यांना केसीसी देण्यात आडकाठी आणू शकत नाही.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे भारतातील जवळ-जवळ ११.४५ कोटी शेतकऱ्यांचा आधार कार्ड, रेवेन्यू रेकॉर्ड, बँक अकाउंट नंबर डेटाबेस केंद्र सरकारला मिळाला आहे. पीएम किसान योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या रेकॉर्डला केंद्रीय कृषी मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डसाठी आडकाठी करू शकत नाही.
हेही वाचा : पीएम किसान योजनेतील पाच बदल; शेतकऱ्यांसाठी आहेत फायदेशीर
तसेच पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेला किसान क्रेडिट कार्ड योजनेला जोडल्यानंतर केवायसीचा मुद्दाही संपुष्टात आला आहे. म्हणून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी फक्त एक पाणी अर्ज भरावा लागतो. हा अर्ज pmkisan.gov.in वर जाऊन डाऊनलोड करावा लागतो.
तिथे डाऊनलोड केसीसी फॉर्म हा पर्याय देण्यात आला आहे. तो फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे.
Published on: 29 January 2021, 12:32 IST