आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत १० हप्ते जमा झाले आहेत जे की लवकरच ११ व हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. २०२१ मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनामध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत म्हणजेच आता ११ वा हप्ता हा नवीन नियमासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनाचा जे लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांना इथून पुढचा हप्ता ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच मिळणार आहे नाहीतर तुमचा हप्ता थांबला जाईल. पीएम किसान सन्मान निधी योजना चा लवकरच ११ वा हप्ता जारी केला जाणार आहे.
प्रक्रिया जाणून घ्या :-
१. आधार कार्ड आधारे OTP व्हेरिफिकेशनसाठी फॉर्मच्या कॉर्नला जे eKYC हा पर्याय असतो त्यावर क्लिक करावे.
२. बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यावेळी तुम्हाला तुमच्या जवळ असणारे CSC केंद्राला जाऊन भेट द्यावी लागेल.
३. तुम्ही ही प्रक्रिया घरी बसून सुद्धा करू शकता मात्र त्यासाठी तुमच्याकडे मोबाईल, लॅपटॉप तसेच कॉम्प्युटर असावा लागणार आहे.
४. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा https://pmkisan.gov.in/ या पोर्टलवर जावे लागणार आहे.
५. स्क्रिन च्या उजव्या बाजूला तुम्हाला टॅब दिसेल जे की तिथे तुम्हाला e-KYC असे लिहलेले दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे.
यादीत तुमचे नाव तपासा :-
१. यादीत तुमचे नाव आहे का नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे जे की https://pmkisan.gov.in ही वेबसाईट आहे.
२. होमपेज ओपन झाले की त्याच्या कॉर्नर ला Farmers Corner हा पर्याय दिसेल.
३. Farmer Corner या विभागामध्ये तुम्हाला लाभार्थी यादी दिसेल त्या पर्यायावर क्लिक करावे.
४. पर्यायावर क्लिक केल्यावर ड्रॉप डाउन यादी दिसेल त्या यादीमध्ये तुम्हाला राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागणार आहे.
५. राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडल्यानंतर तुम्ही Get Report या पर्यायावर क्लिक करावे.
६. Get Report वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये जे जे लाभार्थी आहेत त्यांची सर्वांची लिस्ट दिसेल त्यामध्ये तुमचे नाव आहे का हे तपासून पाहावे लागणार आहे.
तुमची हप्त्याची स्थिती तपासा :-
१. तुमच्या हप्त्याची स्थिती पहायची असेल तर प्रथमता तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाईटवर जावे लागणार आहे.
२. होमपेज वर तुम्हाला उजव्या बाजूला Farmers Corner वर क्लिक करावे.
३. त्यानंतर तुम्हाला Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
४. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होणार आहे.
५. त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक टाकावा लागणार आहे.
६. हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला स्टेटस ची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
Published on: 11 February 2022, 07:10 IST