सांगण्यात येतंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन्स स्कीमच्या माध्यमातून शाळकरी मुलांसाठी शिष्यवृत्ती, आरोग्य कार्ड आणि इतर अनेक सुविधा देणार असल्याची घोषणा करणार आहेत.पंतप्रधान मोदी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्स कार्यक्रमाद्वारे देशातील असंख्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हस्तांतरित करून याची सुरुवात करणार आहेत. केंद्र सरकारने मागच्या वर्षी 29 मे रोजी ही योजना सुरू केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 या दरम्यानच्या
काळात ज्या मुलांनी आपले पालक गमावले आहेत अशा मुलांना मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.एखाद्याला व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची आवश्यकता असल्यास, PM-CARES यामध्येही मदत करेल. ते म्हणाले की, या मुलांना दरमहा 4,000 रुपये दिले जाणार आहेत ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत होईल.सेच, योजनेविषयी अधिक माहीती अशी की, देशातील मुलांना अन्न आणि निवाराविषयक गोष्टी प्रदान करून
सर्वसमावेशक काळजी आणि संरक्षण सुनिश्चित करणे हा आहे शिक्षण व शिष्यवृत्तीमार्फत सक्षम करून वयाच्या 23व्या वर्षी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे, असा उद्देश आहे.मत्रालयाने एका निवेदनात सांगितलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील शालेय मुलांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती ट्रान्सफर करणार आहेत. केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत मुलांना पासबुक आणि आयुष्यमान भारत योजनेंतर्गत मुलांना ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ द्वारे आयुष्मान हेल्थ कार्ड
देखील दिले जात आहे, यातून 5 लाखांपर्यंतच्या उपचारांची मोफत सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.पंतप्रधान मोदी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्स कार्यक्रमाद्वारे देशातील असंख्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हस्तांतरित करून याची सुरुवात करणार आहेत. केंद्र सरकारने मागच्या वर्षी 29 मे रोजी ही योजना सुरू केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 या दरम्यानच्या काळात ज्या मुलांनी आपले पालक गमावले आहेत अशा मुलांना मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
सरकारने मुलांच्या नोंदणीसाठी pmcaresforchildren.in हे पोर्टल गेल्या वर्षी सुरू केले होते.
Published on: 30 May 2022, 07:20 IST