केंद्र सरकारची सौर पंप योजना एकाच वेळी शेतकर्यांच्या वीज संबंधित सर्व गरजा पूर्ण करून देऊ शकते. यात केवळ १० टक्के वाटा देऊन शेतकरी त्यांच्या गरजेनुसार सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात येईल. याचबरोबर अजून शेतकर्यांसाठी आणखी एक मोठी बातमी आहे. अॅग्री इन्फ्रा फंडकडून सौर पंप बसविण्यास मान्यता मिळाली असून शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी स्वस्त दरात कर्ज मिळणार आहे.
सरकारने सौर पंपसाठी अॅग्री इन्फ्रा फंड वापरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सरकारकडे १ लाख कोटींचा अॅग्री इन्फ्रा फंड आहे. कृषी निधीतून स्वस्त कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे. सरकारने अॅग्रीकल्चर इन्फ्रा फंडातून सौर पंप बसवण्यासाठी १ लाख करोड रूपयांची मंजूरी मिळणार आहे. या माध्यामातून सरकार ३ टक्के स्वस्त दराने कर्ज देते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ७ वर्षे कर्ज मिळते. सन २०२२ पर्यंत सरकारने शेतात १७.५० लाख सौर पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
काय फायदा होईल जाणून घ्या
१) सोलर प्लॅन्ट आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लॅन्ट स्थापित करण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे. २) ज्या जिल्ह्यांमध्ये बँकांना प्राधान्य श्रेणी कर्जे कमी वाटप केली जात होती, त्या जिल्ह्यांमध्ये बँकांना अधिक प्राधान्य द्यावे लागणार आहे. ३) सौर पंप बसविण्यासाठी शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्जही मिळणार आहे. ४) शेतकरी स्वत:च्या जमिनीवर सौर पॅनेल बसवून उत्तम शेती करू शकतात. ५) शेतकर्यांना सौर पॅनेल बसवण्यासाठी फक्त १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ६) केंद्र सरकार शेतकऱ्यांना बँक खात्यात अनुदानाची रक्कम पाठवते.
कुसुम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
१) अर्जदाराने आधी अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in/solar/ वर जावे.
२) त्यानंतर होम पेजवर अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
३) आता तुम्हाला कुसुम योजनेचा फॉर्म दिसेल.
४) अर्जदारास त्याची वैयक्तिक माहिती या फॉर्ममध्ये भरावी लागेल, जसे की त्यांची वैयक्तिक माहितीः – मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
५) ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.
६) आता कुसुम सौर योजनेंतर्गत भरलेला फॉर्म जमा करा.
Published on: 10 October 2020, 05:32 IST