सध्या आपण सोने आणि चांदीच्या दराचा विचार केला तर कधी घसरण तर कधी दरवाढ पाहायला मिळत आहे. जर आपण मागच्या आठवड्याचा विचार केला तर मागच्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात घसरण झालेली बघायला मिळाली. परंतु पाच ते नऊ तारखेच्या दरम्यान थोडीशी वाढदेखील झाली. परंतु जर भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर सोन्याचे भाव अजून देखील 51 हजार रुपयांच्या खालीच असून मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत त्यात किंचित वाढ झालेली आहे.
क्की वाचा:Gold Price: त्वरा करा! आजच खरेदी करा सोने आणि चांदी; सोने 5600 रुपयांनी स्वस्त...
जर आपण 9 सप्टेंबर म्हणजे शुक्रवारचा विचार केला तर भारतीय सराफा बाजारांमध्ये सोन्याचा दर प्रति तोळा पन्नास हजार 779 रुपये होता. परंतु आठवड्याच्या अखेरीस सोन्याच्या दरात वाढ झाली. परंतु आठवड्यात सोन्या-चांदीच्या बाजारात चढ-उतार कायम राहील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ञांचा आहे.
काय होती मागच्या आठवड्यातील सोन्याच्या भावाची स्थिती?
जर आपण 5 सप्टेंबर म्हणजेच गेल्या सोमवारचा विचार केला तर सोन्याचे भाव पन्नास हजार 784 रुपये प्रति तोळा असे होते.
नक्की वाचा:सोने तब्बल 5323 रुपयांनी स्वस्त; आता 10 ग्रॅम सोने मिळणार फक्त 29706 रुपयांमध्ये
मागील आठवड्याच्या तुलनेत यामध्ये किंचित वाढ झाली होती. तसेच मंगळवारी यामध्ये पुन्हा वाढ होऊन तो भाव पन्नास हजार 865 रुपये प्रति तोळा झाला होता. परंतु बुधवारी यामध्ये मोठी घसरण होऊन निचंकी पातळीवर गेला होता. त्यानंतर गुरुवारी सोन्याचे भाव 50 हजार 750 तर शुक्रवारी 50 हजार 779 वर होते.
जर आपण पाच ते नऊ सप्टेंबर चा विचार केला तर सोन्याच्या दरात प्रति तोळा 309 रुपयांची वाढ झालेली आहे.याच कालावधीमध्ये जागतिक बाजारात देखील सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली. जागतिक बाजारामध्ये सोन्याचा भाव 0.4 टक्क्यांनी वाढून $ 1713.62 प्रति औंस झाला.
नक्की वाचा:यंदा च्या साली सोयाबीनच्या उत्पादनात ५२ टक्के घटीची शक्यता, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट
Published on: 13 September 2022, 10:38 IST