आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांची पैकी एक आहे. कुठल्याही प्रकारच्या शासकीय कामांमध्ये आधार कार्ड अनिवार्य आहे. परंतु बऱ्याचदा या आधार कार्ड च्या माध्यमातून तुमची फसवणूक देखील होण्याची दाट शक्यता असते.
अशा प्रकारच्या होणाऱ्या फसवणुकीपासून आपण स्वतःला कसे वाचवू शकतो आणि आपले आधार कार्ड कशा पद्धतीने सुरक्षित ठेवू शकतो याची माहिती या लेखात घेऊ.
अशा पद्धतीने करा सुरक्षित तुमचे आधार कार्ड…
आधार कार्डचा बऱ्याचदा दुरुपयोग करून अनेक घोटाळेबाज,सायबर क्राईम करणारे आपली फसवणूक करू शकतात. ही फसवणूक होऊ नये म्हणून यूआयडीएआय ने त्यासाठी आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्याची सुविधा दिली आहे. जो आपल्याला आधार कार्ड ची गरज असते तेव्हा ते अनलॉक करून त्याचा वापर करू शकतो आणि गरज नसल्यास ते लॉक करून सुरक्षितपणे ठेवू शकतात.
आधार कार्ड लॉक,अनलॉक कसे करावे?
यासाठी सर्वप्रथम माय आधार या संकेतस्थळावर असलेल्या आधार सेवा म्हणजेच आधार सर्विसेस या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर या ओपन झालेल्या पेजवर थोडस स्क्रोल केल्यानंतर आधार लॉकआणिअनलॉकलोक असे दोन पर्याय येतात. त्यानंतर आपण लॉक युआयडि वर क्लिक करा.त्यानंतर जे कार्ड लॉककरायचे असेल त्या कार्डचा बारा अंकी आधार क्रमांक टाकावा.त्यानंतर पेजवर विचारले जाणारे माहिती भरावी. त्यानंतर तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे याची एकदा खात्री करा. ते तपासण्यासाठी सुरक्षा कोड वापरा.
हा सुरक्षा कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला ओटीपी आणि टीओटीपीया दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा लागतो.त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो. हा आलेला ओटीपी एंटर करा. त्यानंतर तुमचा आधार लिंक केलेला नंबर त्या ठिकाणी प्रविष्ट केला जाईल आणि तुमच्या आधार कार्ड लॉक किंवा अनलॉक होईल अशाप्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकतात.
Published on: 19 January 2022, 02:30 IST