काल राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यामध्ये राज्यातील जे शासकीय अधिकारी व कर्मचारी हे वयाच्या चाळीस ते पन्नास वर्षातील आहेत अशा कर्मचाऱ्यांची दोन वर्षातून एकदा तर जे कर्मचारी व अधिकारी 51 व त्यावरील वयोगटातील आहेत त्यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्यासाठी पाच हजार रुपये इतकी रक्कम प्रतिपूर्ती म्हणून देखील देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार 40 वर्षावरील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासण्या, ठरवून दिलेल्या नमुन्यात व त्या त्या आर्थिक वर्षात करून घ्याव्या लागणार आहेत. या वैद्यकीय तपासणी करण्यासाठी खर्चाची रक्कम स्वतः संबंधित हॉस्पिटलला प्रथम द्यावी लागणार आहे व त्याची प्रतिपूर्ती आपल्या ऑफिस मधून मिळवावी लागणार आहे. अजून काही निर्णय झाले ते पाहू.
अशासकीय अनुदानित कला शिक्षकांना विविध लाभ
अनुदानित कला संस्था कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील 31 अशासकीय कला संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवा विषयक लाभ देण्यास झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कालबद्ध पदोन्नती योजना, अध्यापक पदांना द्विस्तरीय, त्रिस्तरीय वेतन संरचना तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण याच्या तरतुदी आणि इतर विषय नमूद करण्यात आले आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्ता मध्ये वाढ
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात एक एप्रिलपासून सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली असून एस 20 व त्यावरील वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूहात पाच हजार चारशे रुपये व इतर ठिकाणी दोन हजार सातशे रुपये,एस 7 ते एस 19 स्तरासाठी अनुक्रमे 2700 ते तेराशे 50 रुपये आणि एस 1ते एस सहा स्तरासाठी अनुक्रमे एक हजार ते 675 रुपये मिळतील.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो जनावरांमधील प्रजननक्षमतेसाठी उपयोगी ठरतात 'या' वनौषधी, होईल फायदा
बैलगाडा शर्यती मधील खटले मागे
बैलगाडा शर्यती आयोजन केल्यामुळे दाखल झालेले खटले मागे घेण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. परंतु त्यासाठी काही अटी टाकण्यात आले आहेत. त्या म्हणजे बैलगाडा शर्यत तिच्या घटनेत जीवित हानी झालेली नसावी, खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे पाच लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. इत्यादी अटी यामध्ये टाकण्यात आले आहेत.( संदर्भ-दिव्यमराठी)
Published on: 01 April 2022, 10:25 IST