Others News

आपल्याला माहिती आहेच की जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये बऱ्याच प्रकारचे कायदेशीर मुद्दे उद्भवतात. त्यामुळे अनेक मनस्ताप सहन करावे लागतात व उगीचच कोर्टकचेऱ्याचीफेरफटका,आर्थिक फसवणूकआणि विकोपाला गेलेले वादनिर्माण होतात. त्यामुळे जमीन घेताना आणि ती खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेतली तर भविष्यात होणाऱ्या त्रासापासून आपला बचाव करता येऊ शकतो. या लेखात आपण त्या बद्दलची माहिती घेऊ.

Updated on 21 September, 2021 10:43 AM IST

 आपल्याला माहिती आहेच की जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये बऱ्याच प्रकारचे कायदेशीर मुद्दे उद्भवतात. त्यामुळे  अनेक मनस्ताप सहन करावे लागतात व उगीचच कोर्टकचेऱ्याचीफेरफटका,आर्थिक फसवणूकआणि विकोपाला गेलेले वादनिर्माण होतात. त्यामुळे जमीन घेताना आणि ती खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेतली तर भविष्यात होणाऱ्या त्रासापासून आपला बचाव करता येऊ शकतो.  या लेखात आपण त्या बद्दलची माहिती घेऊ.

 जमीन खरेदी करताना अशा पद्धतीने घ्या काळजी

  • जमीन भोगवटादार वर्ग एक आहे की 2, देवस्थान इनाम आहे कि महार वतन,कुळाची जमीन आहे का याची खात्री करावी.
  • भोगवतदार वर्ग 2 म्हणजे नवीन अटी व शर्तीची जमीन असते.त्यामुळे अशी जमिनी घेतानानेमक्या अटी व शर्ती काय आहेत ते पहावे.
  • जी जमीन घेणार त्या जमिनीचा तीस वर्षांपूर्वी चे सातबारे काढावेत.त्यामुळे हीजमीन मूळ मालकाच्या नावावर कशी झाली याची पडताळणी करता येते.
  • ज्याची जमीन घेणार त्या जमीन विकणार्‍या ला बहिणी किती आहेत हे जाणून घ्यावे.त्यामुळे ही संबंधित जमीन वारसा हक्काने आली आहे की स्वकष्टार्जित आहे हे कळतेत्यामुळे ते बारकाईने कळते.
  • संबंधित जमिनीचा सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात अन्य व्यक्तीचे नाव आहे का किंवा एखाद्या कुळाचे नाव आहे का याची खातरजमा करावी.
  • जमीन जर कूळ कायद्याची असेल तर जमीन मिळून दहा वर्ष झाली असेल तर नजराना भरून खरेदीची परवानगीप्रांताअधिकाऱ्याकडून घ्यावी. दहा वर्षापेक्षा कमी कालावधी जमीन मिळायला झाला असेल तरकलम 43 नुसार आवश्यक कार्यवाही करून संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी.यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर आधीखरेदी व नंतर परवानगी मागितली तर असा व्यवहार रद्द होतो.
  • संबंधित मूळ जमीन मालकाच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र व त्यांच्या प्रत्यक्ष ताब्यात वहिवाटीत असलेले क्षेत्र बारकाईने तपासावे.
  • शेतजमिनी जाण्याचा रस्ता,त्या जमिनीला पाणीपुरवठयाची साधनजसे की विहीर, शेततळे,बोरवेल,शेतात असलेली झाडे, शेतात असलेले घर किंवा शेड आदी संबंधित जमिनीवर असल्यास त्याचा उल्लेखखरेदी करताना खरेदी खतात अवश्य करावा.
  • जमिनीवर कुणाचा बोजा आहे का ते तपासावे.
  • संबंधित जमिनीची गटवारी झाली असल्यास गटवारी चा उतारा काढून गटवारी पूर्वीचे व गटवारी नंतर झालेल्या क्षेत्रातील बदल बारकाईने तपासावेत.
  • विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे जमिनीचा रस्ता हा नेमका बांधावरून आहे का जमीनीत जाण्यासाठी रस्ता आहे हे पहावे.
  • मध्ये जमिनीबाबत कुठले कोर्ट कचेरी मध्ये प्रकरण प्रलंबित नाही ना याची खात्री करावी.जमीन व्यवहारामुळे पुनर्वसन,तुकडेबंदी,नागरी कमाल जमीन धारणा कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • जर एखाद्या जमिनीच्या सातबार्‍यावर खासगी वन,राखी व वन  असा शेरा असल्यास असे जमीन खरेदी करू नये.
  • जमिनीचा व्यवहार पक्का झाल्यास द्यावी लागणारी रक्कम बँकेमार्फत द्यावी व त्याचा उल्लेख खरेदीखतातकरावा.
  • जमीन मोजणी चा नकाशा पाहून जमिनीचा आकार पहावा.चतुर सीमा नुसार संबंधित गावाचा नकाशा असल्याची खात्री करावी.
  • जमीन मालकाने संबंधित जमिनीवरचे कर भरल्याची खात्री करावी.
  • जमिनीचा व्यवहार थेट जमीन मालकाशी करावा.एखादा एजंट मार्फत व्यवहार करायचा असल्यास त्याला द्यायचे कमिशनची बोलण्या आधीचकरावी.
  • विशेष म्हणजे संबंधित जमीन कुठल्या झोनमध्ये येतेतेपहावे.उदाहरणार्थ रहिवासी,शेती,शेती ना विकास,औद्योगिक इत्यादी.
  • अर्धवट पद्धतीने जमिनीचे व्यवहार न करता तो रजिस्टर पद्धतीने करावा.
  • नवीन शर्तीची जमीन घेत असाल तर  सर्व अटींची पूर्तता झाली आहे का नाही हे पाहावे. नवीन शर्तीची जमीन संबंधितांचे परवानगी घेतल्याशिवाय खरेदी करू नये.
  • खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर खरेदीखताची मूळ प्रत व इंटेक्स टू म्हणजेच सूची क्रमांक दोन ताब्यात घ्यावा.
  • खरेदीखत झाल्यावर तात्काळ सातबारावर नाव लावून घ्यावे.( संदर्भ- सोसायटी)
English Summary: take precaution before land bying
Published on: 21 September 2021, 10:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)