Others News

पैशांची बचत आणि त्या बचतीची केलेली गुंतवणूक हे भविष्यासाठी फार आवश्यक अशी बाब आहे. परंतु बऱ्याचदा प्रश्न पडतो की गुंतवणूक करायची पण कुठे? आपण गुंतवलेला पैसा सुरक्षित राहील असे गुंतवणूक प्लॅटफॉर्म कोणते? याबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडलेले असतात.

Updated on 28 August, 2021 8:41 PM IST

पैशांची बचत आणि त्या बचतीची केलेली गुंतवणूक हे भविष्यासाठी फार आवश्यक अशी बाब आहे. परंतु बऱ्याचदा प्रश्न पडतो की गुंतवणूक करायची पण कुठे? आपण गुंतवलेला पैसा सुरक्षित राहील असे गुंतवणूक प्लॅटफॉर्म कोणते? याबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडलेले असतात.

बरेचजण मॅच्युअल फंड, एल आय सी इत्यादी ठिकाणी आपले पैसे गुंतवतात. परंतु पोस्ट ऑफिस हादेखील पैसे गुंतवण्याचा चांगला आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे. या लेखामध्ये पोस्ट ऑफिसच्या सुमंगल रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स स्कीम बद्दल जाणून घेणार आहोत.

 काय आहे पोस्टाचे सुमंगल रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स स्कीम?

योजना प्रामुख्याने ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत तुम्हाला विमा देखील मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा निश्चित रक्कम ही मिळते. या योजनेमध्ये तुम्हाला दररोज 138 रुपये भरून ते 20 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात.

 या योजनेची वैशिष्ट्ये

 या योजनेची सुरुवात 1995 मध्ये झाली होती. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस सहा प्रकारच्या वेगवेगळ्या विमा योजना राबवत असते. या योजनेअंतर्गत समएशु्रेडरक्कम ही दहा हजार रुपये आहे आणि अधिकाधिक रक्कमही  दहा लाख रुपये इतकी आहे.पॉलिसी पूर्ण होण्याच्या काळापर्यंत जर पॉलिसीधारक जिवंत असेल तर त्या व्यक्तीला मनी बॅकचा देखील फायदा मिळतो. या पोलिसी दरम्यान जर विमाधारकाच्या मृत्यू झाला तर वारसाला समअसूर्ड रकमेसह बोनस दिला जातो.

 या योजनेसाठी आवश्यक पात्रता किंवा अटी

या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी वयहे कमीत कमी एकोणवीस आणि जास्तीत जास्त 45 असणं आवश्यक आहे. सुमंगल योजनेसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी एक म्हणजे तुम्ही जर पंधरा वर्षाची पॉलिसी घेतली तर तुम्हाला सहा, नऊ आणि बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक 20 टक्के मनी बॅक चा  लाभ मिळेल.

त्याच बरोबर मॅच्युरिटी च्या वेळी बोनस सोबतच उर्वरित 40 टक्के रक्कम मिळेल. तसेच दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही जर वीस वर्षाची पॉलिसी घेतली तर तुम्हाला आठ,बारा आणि सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी 20 टक्के पैसे मिळतील.इतर रक्कम वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळेल शिवाय सोबत बोनस देखील दिला जातो.

English Summary: sumangal rural postal life insurence scheme to post office
Published on: 28 August 2021, 08:41 IST