शासनाने विविध छोट्या बचत योजना घोषित केले आहेत. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना ही एक महत्वाची योजना असून मुलींच्या भविष्यासाठी एक लाभदायक योजना आहे
सध्या नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. परंतु यावेळेस सरकारने लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. म्हणून लाभधारक ग्राहकांना एप्रिल-जून तिमाहीमध्ये देखील जुन्या दरानुसार व्याजाचा लाभ मिळणार आहे. या लेखामध्ये आपण सुकन्या समृद्धी योजना विषयी माहिती घेऊ.
नक्की वाचा:शेळीच्या लेंडीपासून यशस्वी गांडूळ खत व्यवसाय,शेतीसाठी वरदान आणि होणार बक्कळ फायदा
सुकन्या समृद्धी योजना
या योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या मुलीसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला किमान 250 रुपये आणि कमाल दीड लाख रुपये गुंतवू शकतात. केंद्र सरकारच्या या लोकप्रिय योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी आरामात जमा करू शकतात. जर तुम्हाला या योजनेमध्ये तुमच्या मुलीसाठी खाते उघडायचे असेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत जाऊन हे खाते उघडू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र द्यावे लागते.
तसेच मुलाचे आणि पालकांचे ओळखपत्र ही सादर करावे लागते. या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या खातेदारांना सरकार सध्या 7.6 टक्के चक्रवाढ व्याजाचा फायदा देत आहे. सरकार प्रत्येक तिमाहीत या योजनेच्या व्याजदरांमध्ये सुधारणा करीत असते.
नक्की वाचा:आता मराठवाड्याचे टेन्शन मिटले; फळपिकाबाबात राज्य सरकारचा मोठा निर्णय
या योजनेमध्ये तुम्हाला फक्त पंधरा वर्षे पैसे जमा करता येतात. मुलीचे वय 21 वर्ष होईपर्यंत तुम्हाला पैसे जमा करण्याची गरज नाही.
जर तुम्हाला या मधून पंधरा लाखाचा निधी उभा करायचा असेल तर तुम्ही या योजनेत प्रतिमहिना तीन हजार रुपये गुंतवले तर एका वर्षात तुमचे 36 हजार रुपये जमा होतात. या 36 हजारावर तुम्हाला 7.6 टक्के चक्रवाढ व्याज दराने व्याजाचा फायदा मिळतो. या हिशोबाप्रमाणे तुम्ही 21 वर्षाच्या मुदतीनंतर जवळजवळ 15 लाख 22 हजार 221 रुपयांचा निधी जमा करू शकतात.
Published on: 05 April 2022, 07:57 IST