पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यामागची मुख्य भूमिका ही पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवण्याचा उद्देश असून
शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली वर भगवा फडकवण्याचे पाहिलेले स्वप्नपूर्तीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून शिवसेनेची सत्ता आणून सुरुवात करणे गरजेचे असल्याचे तसेच या कामासाठी शिवसैनिकांनी तयार रहावे असे आवाहन शिवसेना नेते, पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते दिवाकर रावते यांनी केले. शिवसेनेच्या वतीने माझी संघटना, माझा पक्ष यानुसार शिवसेना पदाधिकारी यांचा संवाद मेळावा कराड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, अनिल बाबर, कोल्हापूर सिंधुदुर्ग चे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सातारा उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
पुढे बोलताना दिवाकर रावते म्हणाले की इतर पक्षांमध्ये कार्यकर्ते असतात, परंतु शिवसेनेमध्ये शिवसैनिक आहेत. हे शिवसैनिक तन-मन-धनाने काम करतात. शिवसेना मध्ये शिवसेनाप्रमुखांच्या तत्व बाळगणारे शिवसैनिक तयार झाले आहेत. शिवसैनिकांना वैचारिक वैभव आहे.शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात भगिनी काम करतात.पश्चिम महाराष्ट्र मध्ये यांची संख्या अधिक आहे. शिवसेना नेहमी सकारात्मक राहते आणि सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र मध्ये निष्ठावंत शिवसैनिक तयार केले आहेत. शिवसेनेचा शिवसैनिक हा लेचापेचा नाही.
शिवसैनिक नेहमी जन सामान्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली वर भगवा फडकवण्याचे पाहिलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्जवबळकट व्हावे, असे आवाहनही शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केली.
Published on: 02 February 2022, 08:55 IST