Others News

सध्या सणासुदीचे दिवस तोंडावर येऊन ठेपले असून पोळ्या नंतर आता सणांची रेलचेल सुरू होणार आहे. राज्यामधील सगळ्यात महत्त्वाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव हा 31 ऑगस्ट पासून सुरू होत असून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे कर्मचारी, अधिकारी आणि जे काही पेन्शन धारक आहेत त्यांना सगळे उत्सव आनंदाने व कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण न येता साजरा करता यावेत यासाठी ऑगस्ट महिन्याचे जे काही वेतन आणि पेन्शन धारकांचे निवृत्ती वेतन हे गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यात यावे असे परिपत्रक शासनाने बुधवारी काढले.

Updated on 25 August, 2022 1:10 PM IST

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यावर्षीच्या कापूस हंगामाची सुरुवात धडाकेबाज,वाचा 'या' राज्यातील सुरुवातीचे भाव

यानुसार ऑगस्ट महिन्याचे वेतन आणि पेन्शन 29 ऑगस्ट रोजी करण्यास मान्यता देण्यात आली असून पगाराची प्रदान वेळेत होण्यासाठी अधिकाऱ्यांनी वेतन देयके कोषागारात सादर करावीत असे देखील या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नक्की वाचा:7th Pay Commission: खुशखबर! सणासुदीच्या मुहूर्तावर मिळणार 18 महिन्यांची थकबाकी! कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्क्यांनी वाढ

 या परिपत्रकातील तरतुदी कुणाकुणाला होतील लागू?

या संदर्भातील जे काही शासकीय तरतुदी आहेत ते मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था,राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व कृषी विद्यापीठे व

त्यांच्याशी संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी,  तसेच पेन्शन धारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनादेखील या तरतुदी लागू केल्या जाणार आहेत.

नक्की वाचा:Sudhir Mungantivar: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस आणि बैलाचा मृत्यू झाल्यास मिळणार 'इतकी' मदत

English Summary: state goverment employee and pension holders gets sallary at 29 august
Published on: 25 August 2022, 01:10 IST