Others News

स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून कायम ग्राहकांच्या हितासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ही बँक आणत असते. एवढेच नाही तर ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कायम अलर्ट राहणारी बँक म्हणजे एसबीआय अशी बँकेची ओळख आहे. याच पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बचत खातेदार आणि क्रेडिट कार्ड धारकांसाठी व्हाट्सअप बँकिंग सेवा सुरू केली आहे.

Updated on 25 July, 2022 5:32 PM IST

 स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून कायम ग्राहकांच्या हितासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ही बँक आणत असते. एवढेच नाही तर ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कायम अलर्ट राहणारी बँक म्हणजे एसबीआय अशी बँकेची ओळख आहे. याच पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बचत खातेदार आणि  क्रेडिट कार्ड धारकांसाठी व्हाट्सअप बँकिंग सेवा सुरू केली आहे.

या सेवेच्या माध्यमातून स्टेट बँकेचे ग्राहक आता व्हाट्सअप वरून त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक तसेच मिनी स्टेटमेंट इत्यादी तपासू शकणार आहेत.

नक्की वाचा:Investmemt News: महिन्याला 5 हजार रुपयांची करा गुंतवणूक आणि मिळवा 36 लाख, जाणून घ्या तपशील योजनेचा

त्यासोबतच क्रेडिट कार्डधारक ग्राहक त्यांच्या खात्याचे सगळे डिटेल्स, त्यांचे रिवॉर्ड पॉईंट्स, भरायची राहिलेली शिल्लक आणि बरेच काही कामांसाठी याचा वापर ग्राहक करू शकणार आहेत. तुम्हाला जर ही सेवा वापरायची असेल तर यासाठी अगोदर तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे. अशी नोंदणी कोणत्या प्रकारे करायची हे स्टेप बाय स्टेप पाहू.

अशाप्रकारे करा नोंदणी

1- सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या बँकेत रजिस्टर मोबाइल क्रमांकावरून "WAREG" असे टाईप करून स्पेस द्या व तुमचा खाते क्रमांक नमूद करा. त्यानंतर 7208933148 वर संदेश पाठवा.

नक्की वाचा:मत्स्यपालनातून साधा प्रगती!सरकारच्या 'या' योजनेतून मिळवा 60 टक्के सबसिडी अन सुरु करा मत्स्यपालन

2-संदेश पाठवल्यानंतर, बँकेच्या 9022690226 क्रमांकावरून तुमच्या व्हाट्सअप वर एक संदेश येईल.

3- त्यानंतर तुमची सेवेची नोंदणी पूर्ण होईल. तुम्हाला  सेवा वापरायची असेल तर तुम्ही  'HI' पाठवा.

4- त्यानंतर तुमच्या समोर एक सर्व्हिस मेनू दिसतो. तुम्हाला जे सेवा वापरायचे असेल ती सेवा निवडावी.

5- तसेच तुमची काही क्युरी असेल तर तुम्ही ती संदेश च्या माध्यमातून टाईप करू शकता.

 क्रेडिट कार्डधारक अशी करू शकतात नोंदणी

 स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडिट कार्ड धारकांना ही सेवा वापरण्यासाठी 'OPTIN' हा हा व्हाट्सअप मेसेज 9004022022 या क्रमांकावर पाठवावा.

नक्की वाचा:दिलासादायक बातमी! पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांचे वाटप

English Summary: state bank start whatsapp banking service for bank customer and credit card holder
Published on: 25 July 2022, 05:32 IST